डॉक्टर गौरी गर्जे प्रकरणात ट्विस्ट, अनंतच्या शरीरावर आढळल्या जखमा, घटनेआधी झालेल्या संवादांचे र


मुंबई: भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे याच्या पत्नीने डॉक्टर गौरी पालवे गर्जे (Gauri Garje Palve Death Case) यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यांनी मुंबईतील वरळी परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. आत्महत्येची (Gauri Garje Palve Death Case) ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी पती अनंत गर्जे याच्यासह दीर आणि नणंदेवर गुन्हा दाखल केला असून अनंत गर्जेला (Gauri Garje Palve Death Case) अटकही केली आहे. या प्रकरणी सखोल तपास व्हावा, आमच्या मुलीची आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा दावा पालवे कुटूंबाने केला आहे. तर या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.(Gauri Garje Palve Death Case)

Gauri Garje Palve Death Case : गौरी पालवे- गर्जे आणि अनंत गर्जे दोघांच्याही शरीरावर जखमा

अनंत गर्जेच्या अटकेनंतर आता नवनवीन माहिती समोर येत आहे. ही धक्कादायक घटना समोर आली तेव्हा मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अनंत गर्जेचं अफेअर आणि सातत्याने होणाऱ्या वादाला कंटाळून गौरी पालवेंनी आत्महत्या (Gauri Garje Palve Death Case) केल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे गौरी पालवेंच्या सोबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. गौरी पालवे- गर्जे आणि अनंत गर्जे दोघांच्याही शरीरावर जखमा आढळून आल्याची माहिती आहे. यामुळे गौरीचा मृत्यू होण्याआधी अनंत आणि गौरीमध्ये झटापट झाली होती का? असा संशय व्यक्त होत आहे.(Gauri Garje Palve Death Case)

Gauri Garje Palve Death Case : दोन डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवली

याशिवाय घटनेपूर्वी दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंगही पोलिसांच्या हाती लागले असून त्याची सखोल तपासणी पोलीस करत आहेत. या तपासाअंती गौरीने आत्महत्या की हत्या? हे स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी अनंत गर्जे याची काल (गुरुवारी, ता २७) पोलीस कोठडी संपली होती. त्यामुळे त्याला वरळी येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. याठिकाणी पोलिसांनी तपासातील ही खळबळजनक माहिती दिली. यानंतर आरोपीला अधिकच्या तपासासाठी दोन डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे.(Gauri Garje Palve Death Case)

अनंत गर्जे आणि गौरी गर्जे दोघांच्याही शरीरावर जखमा आढळल्याने या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. तर तपासामध्ये आणखी कोणते खुलासे होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. डॉ. गौरी पालवे मृत्यू प्रकरणात वरळी पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात ही खळबळजनक माहिती दिली आहे. मृत गौरी व आरोपी पती अनंत गर्जे याच्या शरीरावर जखमा आढळल्या आहेत. घटनेपूर्वी दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंगही मिळाले असून, त्याची तपासणी करून आत्महत्या की हत्या, हे स्पष्ट होणार असल्याचे सांगितले.

डॉ. गौरी यांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी अनंत गर्जे याची पोलिस कोठडी संपल्याने त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडी दोन डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. या प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या अनंतच्या दोघा भावंडांचा शोध सुरू असून, त्यांना अटक करण्यासाठी अनंत गर्जेची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.