घरखर्चासाठी घरफोडी, दोघांना डी. एन.नगर पोलिसांनी अटक
घरखर्चासाठीच्या पैशासाठी घरफोडी करणाऱ्या दोघांना डी. एन.नगर पोलिसांनी अटक केली. रशीद शेख आणि सैद अहमद मस्तान शेख ऊर्फ अली अशी त्या दोघांची नावे आहेत. नोकरीतून जास्त पैसे मिळत नसल्याने त्याला शॉर्टकट मार्ग त्याने अवलंबला. त्या दोघांकडून पोलिसांनी काही रक्कम हस्तगत केली आहे. त्या दोघांच्या अटकेने चार गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
तक्रारदार याचे अंधेरी येथे एक दुकान आहे. गेल्या महिन्यांत अज्ञात व्यक्तीने त्याच्या दुकानाचे शटर तोडले. चोरट्याने दुकानातून पैसे चोरून पळ काढला. घडल्याप्रकरणी त्याने डी. एन. नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप काळे याच्या पथकातील पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, उप निरीक्षक अविनाश दराडे, बोटे, बंगाळे, बाबर, वरे, पोळ, वाकोडे, पात्रे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसी टीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी सैदला नालासोपारा येथून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत रशीदचे नाव समोर आले. त्यालादेखील पोलिसांनी अटक केली. नोकरी करून जास्त पैसे मिळत नसल्याने त्याने घरखर्चासाठी शॉर्टकट मार्ग अवलंबला. ते दोघे दिवसा रेकी करून रात्रीच्या वेळेस घरफोडी करायचे. त्या दोघाविरोधात 13 हुन विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. त्या दोघांना लवकरच लोकमान्य टिळक मार्ग आणि भोईवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे.
Comments are closed.