विजेचा धक्का लागून दोन मुलांचा मृत्यू

तामिळनाडूत आरओ प्रकल्पानजीक हृदयद्रावक दुर्घटना

वृत्तसंस्था/रामनाथपुरम

तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यात बंद पडलेल्या वॉटर प्यूरीफिकेशन प्रकल्पानजीक खेळत असलेल्या दोन मुलांचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना कमुथी भागात घडली आहे. 9 वर्षीय निरैमथी आणि तिचा 6 वर्षीय भाऊ बालप्रणव एका वीजप्रवाहित धातूच्या संरचनेच्या संपर्कात आले होते. प्रकल्पाच्या आत कापलेल्या विजेच्या अने केबल्समधून वीज प्रवाहित झाल्याचा संशय आहे. पेयजल प्रकल्प मागील 6 वर्षांपासून बंद होता, परंतु त्याचा वीजपुरवठा आतापर्यंत तोडण्यात आला नव्हता. या घटनेनंतर प्रशासनाने पंचायत सचिव के. रासू यांना देखभालीत निष्काळजीपणा दाखविल्याच्या आरोपाखाली निलंबित केले आहे. मुलांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी रस्त्यांवरील वाहतूक रोखत जबाबदार लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी परिवाराबद्दल संवेदना व्यक्त करत दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांकरता आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Comments are closed.