मनसेचे दोन उमेदवार गायब; कुटुंब, पक्षाच्या नेत्यांसोबतही संपर्क नाही; नेमकं काय घडलं?
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक 2026: अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (Ahilyanagar Municipal Corporation Election 2026) रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार कालपासून गायब झाले आहेत. अद्यापही या उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबाशी किंवा पक्षाच्या नेत्यांशी संपर्क झालेला नाही. प्रभाग क्रमांक सतरा मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असे गायब झालेल्या मनसेच्या उमेदवारांची (MNS Candidate) नावे आहेत. याबाबत अद्याप कुटुंबियांकडून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
दरम्यान मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ म्हणाले की, केडगावचा इतिहास हा रक्तरंजित आहे. त्यामुळे कुटुंबीय जसे काळजीत आहेत तसेच आम्ही देखील काळजीत आहोत. याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील पोलीस प्रशासनाशी संपर्कात असल्याची माहिती डफळ यांनी दिली. मात्र ही मनसे आहे, जर आमच्या अंगावर याल तर आम्ही शिंगावर घेऊ, असाही इशारा डफळ यांनी दिला. (Ahilyanagar Municipal Corporation Election 2026)
अहिल्यानगर मनपात 68 जागांसाठी निवडणूक- (Ahilyanagar Municipal Corporation Election 2026)
अहिल्यानगर मनपात 68 जागांसाठी निवडणूक होणार आहे. सर्वच पक्षाचे उमेदवार जोरदार तयारी करत आहेत. मनपा निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्या दिवशी 28 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. एकूण 477 अर्जांपैकी 449 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. आज आणखी किती उमेदवार माघारी घेतात हे पाहावं लागेल…मात्र नगरकरांना येऊ घातलेल्या नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहेत.
अहिल्यानगरमधील सध्याचं राजकारण- (Ahilyanagar Municipal Corporation Current politics)
2018 च्या महानगरपालिका निवडणुकीनंतर अहिल्यानगरच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडून आले आहेत. शहराच्या राजकारणात प्रभावी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्याने महानगरपालिकेतील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित पवार गटाकडे, तर शिवसेनेचे नगरसेवक एकनाथ शिंदे गटाकडे गेल्याने महाविकास आघाडीतील सत्ताधारी नगरसेवकांची संख्या आता अवघ्या एक-दोनवर येऊन ठेपली आहे. मात्र, असे असले तरी आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनेही कंबर कसली असून ती ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.