क्रीडा क्षेत्रातील दोन दिग्गजांना विचारे प्रतिष्ठानचा मानाचा मुजरा; उदय देशपांडे, संदीप चव्हाण यांचा आज जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मल्लखांबाच्या जागतिक प्रसारासाठी आयुष्य वेचणारे उदय देशपांडे आणि सहा ऑलिम्पिकसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वार्तांकन करणारे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण यांना यंदाच्या मनोहर विचारे प्रतिष्ठानच्या ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवार, 21 नोव्हेंबरला सायंकाळी 4.30 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात हा सोहळा रंगणार आहे.

विचारे प्रतिष्ठानच्या या सोहळ्यात क्रीडा क्षेत्रातील दिग्गज दिनेश लाड, रघुनंदन गोखले, अनुपमा गोखले, आरती प्रधान यांच्यासह क्रीडा पत्रकार सुहास जोशी, अशोक बोभाटे अशा अनेक क्रीडा मान्यवरांचा गौरव होणार आहे. शरीरसौष्ठव प्रशिक्षक मधुकर धीरत यांचाही विशेष सत्कार केला जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय विचारे यांनी दिली.

या पुरस्कार सोहळय़ात माजी कसोटीपटू प्रवीण अमरे, ग्रॅण्डमास्टर प्रवीण ठिपसे आणि माजी ‘भारत श्री’ विजू पेणकर यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला जाणार आहे.

Comments are closed.