‘दंगलीत दगड भरलेले ट्रक आले कुठून हे विचारण्यापेक्षा..’उदयनराजेंचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले.

उदयनराजे भोसल:औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून सोमवारी नागपूरमध्ये हिंसाचार उफाळला .या हिंसाचारावरून राजकीय क्षेत्रात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत .नागपूरमध्ये दोन गटात झालेल्या राड्यात दंगलखोरांनी उभे असलेल्या गाड्यांची तोडफोड केली . दुचाकी वाहनांची जाळपोळ झाली . दगडफेक झाली .या घटनेचे पडसाद विधिमंडळातही आज पाहायला मिळाले .अनेक विरोधक ही दंगल पूर्वनियोजित असल्याचा आरोप करतायत .दरम्यान, नागपूर मध्ये झालेल्या हिंसाचारावरून भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दंगलीत दगड भरलेले ट्रक आले कुठून हे विचारण्यापेक्षा ही विकृती ठेचून कसे काढता येईल हे बघा .काँग्रेसच्या काळात अनेक दंगली झाल्या .त्याला मोठ्या प्रमाणावर आळा घालण्याचे काम भाजप सरकारने केले .काँग्रेसने द्वेष पसरवण्याचे काम केले .असा आरोपही उदयनराजे भोसलेंनी केला .औरंगजेब काही संत नव्हता .त्याने मोडतोड केली द्वेष पसरवला .जर का बर काढली तर या देशाच्या बाहेरच फेकून दिली पाहिजे असेही उदयनराजे भोसले म्हणाले .(Udayanraje Bhosle On Nagpur Violance)

काय म्हणाले उदयनराजे भोसले ?

‘ छत्रपती शिवाजी महाराज असे राजे होऊन गेले ज्यांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला .राज्यकारभारात लोकांचा सहभाग असावा हा दुसरा विचार .लोकशाहीचा दहाच्या रचण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं .त्यांची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही .पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याचे काम मोदीजींनी केले . ही मूठभर लोकं जी व्यक्तीकेंद्रीत असतात ,वैयक्तिक स्वार्थाने पेटून उठलेल्या असतात त्यांची कुठलीही जात-पात नसते .अशा लोकांना ठेचण्याचं काम समाजाने केलं पाहिजे .शिवाजी महाराजांचा शासनमान्य इतिहास प्रसिद्ध करावा .शिवाजी महाराजांचा विचार देशाला अखंड ठेवू शकतो .

दरम्यान अनेक विरोधकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न होतोय .त्यावरही बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले ‘ जेव्हा काँग्रेसची राजवट होती त्यावेळेस भरपूर दंगली व्हायच्या . व्यक्ती केंद्रित लोक समाजाच्या कुठल्याही पक्षाचे किंवा जातीचे नसतात .विकृती असते . दरम्यान शिवाजी महाराजांच्या फौजेत मुस्लिम व्यक्ती नव्हते असे म्हणणाऱ्या नितेश प्राण्यांनी भावनेच्या ओघात असे वक्तव्य करणे स्वाभाविक असल्याचेही उदयनराजे भोसले म्हणाले .या सगळ्याला खऱ्या अर्थी कारणीभूत कोण आहे ?समाजात द्वेष पसरवण्याचा खरा प्रयत्न कोणी केला असेल तर तो काँग्रेस पक्षाने केला .त्या काळात त्यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन काम करायला हवं होतं .काँग्रेसने मुस्लिम समाजाला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्यापेक्षा त्यांनी त्यांनी मुस्लिम समाजाला उचलून धरलं . असेही ते म्हणाले.

पहा सविस्तर

https://www.youtube.com/watch?v=i42iwr612tu

अधिक पाहा..

Comments are closed.