उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीने कोस्टल रोडवर ‘तो’ नियम तोडला, पण मातोश्री कनेक्शन समजताच पोलि


उद्धव ठाकरे: दक्षिण मुंबईत गुरुवारी एक वेगळाच प्रकार घडला. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या नजरेस सायरन वाजवत जाणारा तीन खासगी वाहनांचा ताफा पडला. सुरुवातीला हा ताफा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, चौकशीअंती समजले की हा ताफा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा होता. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी (Police) कोणतीही दंडात्मक कारवाई न करता केवळ समज देत सायरन बंद करण्याचे आदेश दिले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी दक्षिण मुंबईत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे सागरी किनारा मार्गावरून जाणाऱ्या ताफ्याकडे लक्ष गेले. या ताफ्यातील तीन खासगी वाहनांवर सायरन वाजत असल्याचे त्यांनी पाहिले. तत्काळ त्यांनी वाहतूक विभागाला त्या वाहनांची चौकशी करण्याचे निर्देश दिले. वाहतूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी लगेच घटनास्थळी पोहोचले.

Uddhav Thackeray: चौकशीत समोर आली ‘मातोश्री’ची गाडी

त्या वेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात जाण्यासाठी ‘मातोश्री’हून निघाले होते. येथे महाविकास आघाडी, डावे पक्ष आणि मनसे यांच्या 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चाच्या नियोजनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. ठाकरे यांचा ताफा जेव्हा भुयारातून जात होता, तेव्हा त्यातील तीन खासगी वाहनांवर सायरन सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी पाहिले.

उद्धव शक्कराय : दंडायोजी समाज

यशवंतराव चव्हाण केंद्राजवळ ठाकरे यांचा ताफा पोहोचल्यावर वाहतूक पोलिसांनी त्या तीनही वाहनांच्या चालकांकडे ‘परवानगी नसताना सायरन का वाजवले?’ असा सवाल केला. परंतु, हा ताफा उद्धव ठाकरे यांचा असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी प्रकरण सौम्यपणे हाताळले. त्यांनी सायरन काढून ठेवण्याचे निर्देश दिले आणि कोणतीही दंडात्मक कारवाई न करता तेथून परतले.

Mahavikas Aghadi Morcha: उद्या मविआ, मनसेचा मोर्चा

दरम्यान, मतदार यादीतील घोळाविरोधात महाविकास आघाडीने 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली असून, यामध्ये मनसे देखील सहभागी होणार आहे. मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रिटवरून सुरू होईल. मेट्रो सिनेमामार्ग मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबेल. मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी दुपारी 1 ते 4 या वेळेत मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस नेते, डाव्या पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Rohit Arya Encounter: एकनाथ शिंदेंसोबत गप्पा मारतानाचे फोटो, रोहित आर्य ज्या योजनेमुळे आयुष्यातून उठला ती महत्त्वाकांक्षी सरकारी योजना नेमकी काय होती?

आणखी वाचा

Comments are closed.