भ्रष्टाचारी तेतुका मेळावावा भाजप पक्ष वाढवावा, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

उधव ठाकरे: मराठा तेतुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असे समर्थ रामदास म्हणाले होते. पण भाजपवाले म्हणतायेत की, भ्रष्टाचारी तेतुका मेळावावा भाजप पक्ष वाढवावा अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (उधव ठाकरे) यांनी केली. एका मुलाला बापाने विचारले की तुला काय कराचंय? तेव्हा मुलगा म्हणाला की शिकणार मोठा होणार आणि भाजपमध्ये जावून देशकार्य करणार. बाप म्हणाला की तुला असं करायचं असेल तर डायरेक्ट भाजपमध्ये जायचं नाही, आधी दुसऱ्या कोणत्यातरी पक्षात जायचं काहीतरी गडबड घोटाळा कर मग तुला भाजपमध्ये सन्मानाने बोलवतील असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर प्रहार केला.

बऱ्याच वर्षानंतर एका माणसाला त्याच्या आवडीचे खाते मिळाले

बऱ्याच वर्षानंतर एका माणसाला त्याच्या आवडीचे खाते मिळाले आहे असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी क्रिडा मंत्री माणिकराव कोकाटेंना टोला लगावला. रमीला ऑलिम्पिकमध्ये मान्यता मिळेल अशी खोचक टीका देखील कोकाटेंवर त्यांनी केली. ससून डॉकच्या जागेविषयी केंद्र व राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या वादामुळे कोळी बांधवांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना तुम्ही आहात तुमच्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. कालांतराने ज्यांच्यासाठी लढलो ते गायब होऊ नका असेही ठाकरे म्हणाले.

शिवसेनेची स्थापना भूमिपुत्रांना न्याय आणि हक्क देण्यासाठी

अन्याय तोडून टाका असे उद्धव ठाकरे म्हणाले. अन्याय सहन करायचा नाही असे ठाकरे म्हणाले. सरकार एका बाजूला सांगत आहे की आम्ही भाडे भरु. सरकारने पैसे भरले नाहीत, मग मध्ये पैसे कोणी खाल्ले? असा सवाल ठाकरेंनी केला. कोरोनाचा काळ हा अत्यंत वाईट होता. मी अनपेक्षितपणाने मुख्यमंत्रीपद स्वीकारले होते असेही उद्धव ठाकरे म्हणाले. या काळात बऱ्याच गोष्टी आपण करु शकलो नाही. आपलं सरकार आलं असतं तर तुमच्यावर लढण्याची वेळच आली नसते. शिवसेनेची स्थापना भूमिपुत्रांना न्याय आणि हक्क देण्यासाठी झाली असल्याचे ठाकरे म्हणाले. सरकार महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघाले आहे असे ठाकरे म्हणाले. आम्हाला भाषेचा दोष नाही पण सक्ती करु नका.

पियूष गोयल म्हणाले होते की, कोळ्यांचा वास येतो मग त्यांच्या मताला वास येत नाही का? असा टोला उद्धव ठाकरेंनी गोयल यांना लगावला. मंत्र्यांच्या वयाच्या किती तरी जुनी सासून डॉक असल्याचे ठाकरे म्हणाले. मी मंत्री असताना अनेक वादळे आली तेव्हा मच्छीमार किती आत आहेत विचारायचो. एकजूट मजबूत ठेवा असे ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा

Comments are closed.