उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात आज संभाजीनगरमध्ये ‘हंबरडा’ मोर्चा; महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार
उधव ठाकरे हंबरदा मोर्चा: राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज (11 ऑक्टोबर) रस्त्यावर उतरणार आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा कढण्यात येणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून या ‘हंबरडा’ मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. शहरातील क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी ठाम मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं लावून धरली आहे. तसंच पूरग्रस्तांना भरीव मदत देण्याची मागणीदेखील उद्धव ठाकरेंनी केलीय. त्यामुळे आजच्या मोर्चातून उद्धव ठाकरे सरकारवर काय निशाणा साधणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: ‘उद्धव ठाकरेंनी आधी आरशामध्ये पाहावं आणि त्यानंतर मोर्चे काढावेत’
दरम्यानउधव ठाकरे (उधव ठाकरे) यांच्या या समोरवरून महायुतीच्या नेत्यांसएच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरेंनी आधी आरशामध्ये पाहावं आणि त्यानंतर मोर्चे काढावेत’, असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला आहे. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही 16 लाख शेतकऱ्यांचे पैसे दिले, तर ठाकरे सरकारने अडीच वर्षांत कवडीही दिली नाही, असा आरोपही फडणवीसांनी केला. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेंवर हल्लाबोल करत, विरोधी पक्षाला वाटलं नव्हतं की आमचं सरकार एवढं मोठं पॅकेज देईल, असं म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना, हे संकट मोठं आहे आणि या संकटात आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभे आहोत, असंही शिंदे म्हणाले.
Sanjay Kenekar on Hambarada Morcha : पक्ष जिवंत ठेवण्याचा धांगडधिंगा म्हणजे आजचा मोर्चा
तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून महायुतीच्या नेत्यांनीही उद्धव थाकराच्या आजच्या समोरवरून सडकून टीका केलीय. उद्धव ठाकरे आणि शेतीचा काही संबंध आहे का? भुईमुगाच्या शेंगा खाली येतात की वर येतात, हे आधी त्यांनी सांगावं, असा तिखट प्रश्न भाजप आमदार संजय केनेकर यांनी उपस्थित केलाय. उद्धव ठाकरेचा मोर्चा म्हणजे नाचता येईना अंगण वाकड. त्यांनी बांधावर खतं देऊबियाणे देऊ असं म्हटलं ते कुठे गेलं. पक्ष जिवंत ठेवण्याचा धांगडधिंगा म्हणजे आजचा मोर्चा, अशी टीकाहि त्यांनी यावेळी केली?
Sanjay Shirsat on Hambarada Morcha : यांना राजकारण व्यतिरिक्त काही दिसत नाही
उद्धव ठाकरे यांना टोमणे मारायची सवय आहे. कसला हंबरडा. शेतकरी रडतोय, आत्महत्या करतोय, शेती उध्वस्त झाली आहे आणि त्याच्या नावाने हंबरडा मोर्चा काढतात. त्यांना मदत करा, शक्य होईल तेवढी मदत करा. मोर्चा काढून राजकारण करण्यापेक्षा सहकार्य करा. असा सल्ला देत मंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या मोर्चावर टीका केली आहे. यांना राजकारण व्यतिरिक्त काही दिसत नाही. यावेळी विरोधी पक्ष आणि सरकार यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी काम केलं पाहिजे. एकनाथ शिंदे आणि सरकारला शिव्या देणे एवढेच काम त्यांच्याकडे आहे. यांचा मोर्चा नाही यांएफ आणि राजकारण आहे. ही वेळ मोर्च्याची नाही, शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आहे. आजचा मोर्चा म्हणजे नौटंकी. हे इनकमिंग वाले आहेत. आउटगोइंग वाले नाहीत. हे लेना बँक वाले आहेत. असेही मंत्री संजय शिरसाटी म्हणाले?
https://www.youtube.com/watch?v=jlraxp3wl8m
आणखी वाचा
Comments are closed.