विजयी विश्व तिरंगा प्यारा! शिवसेनेची ध्वजवंदना; राष्ट्रभक्तीचा जागर… तुफान गर्दी, अलोट उत्साह

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनाचे दिमाखदार स्वागत शिवसेना भवन येथे करण्यात आले. रात्री 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण करत तिरंग्याला सलामी देण्यात आली. या सोहळ्याला शिवसैनिकांसह जेन-झींची अलोट गर्दी लोटली. राष्ट्रगीताचे सामूहिक गायन झाले आणि भारतमातेच्या जयजयकाराने अवघे दादर दुमदुमून गेले. राष्ट्रभक्तीचा डोळे दिपवणारा सोहळाच सर्वांनी अनुभवला. या वेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत, अनिल परब, उपनेता किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, अरुण दुधवडकर,  गुरुनाथ खोत, आमदार महेश सावंत, वरुण सरदेसाई, सुनील शिंदे, बाळा नर, साईनाथ दुर्गे, सुधीर साळवी, श्रद्धा जाधव, सुप्रदा फातर्पेकर, विजय कदम, निशिकांत शिंदे, विलास पोतनीस या वेळी उपस्थित होते.

Comments are closed.