उद्धव ठाकरेंचा दिल्लीत, शरद पवारांच्या घरी सहकुटुंब भेट; राहुल गांधींकडे स्नेहभोजनाचे निमंत्रण
मुंबई : राज्यातील दोन्ही शिवसेनेचे (Shivsena) प्रमुख नेते आज दिल्ली दरबारी असून दोघांच्याही दौऱ्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उधव ठाकरे (उधव विचार करा) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी दिल्ली दौऱ्यात आपल्या युती व आघाडीतील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामध्ये, एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तर, उद्धव ठाकरेंचं खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेना खासदारांनी स्वागत केले. त्यानतंर, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची सहकुटुंब भेट घेत चर्चा केली. यावेळी, राष्ट्रवादीचे खासदारही उपस्थित होते. शरद पवार यांनी ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो शेअर करत माहिती दिली आहे. आज माझ्या दिल्ली येथील निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी उद्धव ठाकरे, आमदार आदित्य उद्धव ठाकरे ह्यांनी सदिच्छा भेट घेतली, असे पवारांनी म्हटले.
शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ठाकरे कुटुंबीयांच्या भेटीप्रसंगीत खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत, खासदार फौझिया खान, खासदार अमोल कोल्हे, खासदार संजय दिना पाटील, खासदार निलेश लंके, खासदार भास्कर भगरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार मिलिंद नार्वेकर व सलील देशमुख हे सहकरीदेखील आवर्जून उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा महाविकास आघाडीच्या बैठकीच्या निमित्ताने आहे. उद्या 7 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक होईल. त्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे स्नेहभोजनाचे निमंत्रण असल्याने ठाकरे कुटुंबीय या जेवणासाठी गांधींच्या निवासस्थानी जाणार आहे. दरम्यान, या इंडिया आघाडीच्या बैठकीसोबतच शिवसेना उबाठा पक्षाच्या खासदारांची सुद्धा उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यामध्ये बैठक घेणार आहेत.
इंडिया आघाडीच्या बैठकीत होणार चर्चा
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. तसेच, इतर राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांना इंडिया आघाडीचे निमंत्रण देण्यात आले आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने सर्वप्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहतील. इंडिया आघाडीतील जे सर्व महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत, त्यांना स्नेहभोजनाचा निमंत्रण राहुल गांधी यांचे निवासस्थानी असणार आहे, अशी माहिती मिळत आहे. राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून इंडिया आघाडीच्या बैठकी संदर्भात निमंत्रण दिले होते. राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेत्यांनी काहींना फोन करून तर काहींना संस्थेच्या अधिवेशनात निर्माण प्रत्यक्ष भेटून इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी निमंत्रण दिला आहे. इंडिया आघाडीच्या रणनीती संदर्भात चर्चा यामध्ये प्रामुख्याने मतदार यादीतील घोळ, बिहार निवडणूक, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक व इतर राष्ट्रीय मुद्द्यांवर इंडिया आघाडीची एकवाक्यता राहण्यासाठी चर्चा या बैठकीत होणार असल्याची माहिती आहे.
आदित्य ठाकरे केंद्रीयमंत्र्यांना भेटले
आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय जहाजबांधणीमंत्री सोनोवाल यांची भेट घेतली, मुंबई पोर्ट ट्रस्ट ससून डॉकवरील लोकांना सतावत आहेत. MFDC यांना मत्स्यव्यवसायीक भाडं देत आहेत. त्यामुळे त्यांना त्रास देऊ नका, सोनोवाल यांनी सांगितलं की आम्ही त्रास देणार नाही. तसेच, दुसरा विषय म्हणजे शिवडी बीबीटीचा, वरळीमध्ये चाळींचा पुनर्विकास केला तसं तिथेही करावा याबाबत मागणी केल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.