राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन ठाकरेंचा भाजपवर प्रहार

उद्धव ठाकरे: अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात रामरक्षा पठण आंदोलन केले. यापूर्वी त्यांनी दादर आणि ठाणे येथेही अशाच प्रकारचे आंदोलन केले होते. नागपुरातील या आंदोलनाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी उपस्थिती लावली. यावेळी ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष म्हणतात की ज्यांनी श्रद्धेने पैसे दिले नाहीत ते चोरीला गेले. यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, राम मंदीर तुमच्या बापाची जहागिरदारी नाही. आता भाजपा मुक्त राम या आंदोलनाची सुरुवात आहे. राम भक्तांच्या श्रेद्वेवर हा दरोडा असल्याचे ठाकरे म्हणाले. अटल बिहारी वाजपेयी म्हटले होते अभी हिंदू मार नही खायेगा, आता हिंदू उनको माफ नही करेगी अशी भुमिका घेतली पाहिजे असे ठाकरे म्हणाले.

तरुणांना न्याय देणं हेच आमचं हिंदू राष्ट्र

तरुणांना न्याय देणं हेच आमचं हिंदू राष्ट्र आहे. भागवत साहेब तुम्ही म्हणाले की दोन तीन अपत्य जन्माला घाला. पेपर फुटले ती मुलं आपली नाही का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. बाबरी मशिद पाडली त्यावेळी बाळासाहेब एकटे उभे होते. भाजपवाले म्हणत होते की हे शिवसेनेचं काम असेल. बाळासाहेब यांनी ते अंगावर घेतले. अनेकांनी बलिदान केले ते या चोरांच्या पोटापाण्यासाठी नाही, राम मंदीर लुटारुंच्या विरोधात आम्ही आहोत. वर्गाच्या मॉनीटरसारखं बोलू नका रामरक्षा बोलून दाखवा केदारनाथ मंदीरात चोरी झाली आहे असे ठाकरे म्हणाले.

भाजपने दगाबाजी केली म्हणून महाविकास आघाडी स्थापन केली

गद्दारांनांही मला विचारायचं आहे की, तुमच्यात हिंमत आहे तर प्रश्न विचारावा. यांच्यात दम राहिला नाही. हे लाचार आहेत. भाजपने दगाबाजी केली म्हणून महाविकास आघाडी स्थापन केल्याचे ठाकरे म्हणाले. त्यावेळी हिंदुत्व सोडलं अशी टीका केली. मग तुम्ही का आता सोडलं? असा सवाल ठाकरेंनी केला.
काशी विश्वनाथ आणि आयोध्येत जाऊन ही आरती करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

राम मंदिर चोरीबाबतीत चौकशीची नाटक करु नका

राम मंदिर चोरीबाबतीत चौकशीची नाटक करु नका. निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करा. काही ही बोललं तर देशद्रोही ठरवतात असे ठाकरे म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष म्हणतात की ज्यांनी श्रद्धेने पैसे दिले नाही ते चोरीला गेले आमचे तसेच आहे. राम मंदीर तुमच्या बापाची जहागिरदारी नाही असेही ठाकरे म्हणाले.

राम भक्तांच्या बाजूला आहात की मंदीर चोरांच्या बाजूला आहात हे मोहन भागवत यांनी स्पष्ट करावं

मला रामरक्षा येत नसेल पण मला रामाची रक्षा करता येते. चोराहो मध्ये येऊ नका. राम भक्तांच्या बाजूला आहात की मंदीर चोरांच्या बाजूला आहात हे मोहन भागवत यांनी स्पष्ट करावं असे ठाकरे म्हणाले. मी अनेक राज्यांत जाणार आहे. गावोगावी हा लढा नेला पाहिजे. शेतकरी कर्ज मुक्ती झाली नाही. लाडकी बहिण योजनेतील 92 लाख महिला बंद केल्या. महिलांना मिळणाऱ्या साड्या बंद केल्या अशी टीका ठाकरेंनी राज्य सरकारवर केली.

सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांना समर्थन देण्यासाठी उद्या आंदोलन करणार

सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांना समर्थन देण्यासाठी उद्या आंदोलन करणार असल्याचे ठाकरे म्हणाले. मी पहिल आंदोलन करेल आणि त्यांना नंतर दिल्लीत जाऊन भेटेल असेही ठाकरे म्हणाले. सर्व पक्षांना मी उद्याच्या आंदोलनात आमंत्रित करतो. देशासाठी या आंदोलनात सहभागी व्हा असेही ठाकरे म्हणाले.

Comments are closed.