अॅड.असीम सरोदेंची सनद रद्द; उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले, आम्ही सर्व स्वातंत्र्यप्रेमी
असीम सरोदे सनद रद्द : उद्धव ठाकरे बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाकडून विधिज्ञ असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द (Asim Sarode Sanad Cancelled) करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला. असीम सरोदे (Asim Sarode) यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे असीम सरोदे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या कारवाई संदर्भात राजकीय वर्तुळातून अभिप्राय उमटत असताना ‘आम्ही सर्व स्वातंत्र्यप्रेमी असीमजी तुमच्या सोबत आहोत’ अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांना पाठिंबा दिला आहे.
Uddhav Thackeray: आम्ही सर्व स्वातंत्र्यप्रेमी असीमजी तुमच्या सोबत आहोत
हम करेसो कायदा, त्यावर आवाज उठवणारा देशद्रोही. या दिशेने देशाला फरफटत नेण्याचा हा घातक प्रयत्न दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा जोतीराव फुलेंचा अपमान केला तरी त्याला माफी. त्याच्या कारभाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारले तरी काही बोलायचे नाही. मात्र त्यांनी केलेल्या अन्यायाबद्दल बोलणे आणि सत्य सांगणे म्हणजे मोठे पाप आहे, असे मानणे म्हणजे लोकशाहीची अवहेलना करणे आहे. थोडक्यात गप्प रहा आणि आमची गुलामगिरी करा, ह्या कटाचाच हा एक भाग आहे. या देशात आता सत्यासाठी संघर्षच करावा लागणार. आम्ही सर्व स्वातंत्र्यप्रेमी असीमजी तुमच्या सोबत आहोत.
Asim Sarode : मी चुकलो असेल तर सामान्य नागरिकांची मी माफी मागेल
दरम्यान या निर्णयाबद्दल असीम सरोदे म्हणाले तेगेल्या 25 वर्षांपासून अन्यायग्रस्त लोकांना मी मदत करतो, लोकांसाठी मी विविध विषयात काम केलं आहे. न्याय व्यवस्थेची प्रतिष्ठा वाढली पाहिजे, न्याय व्यवस्थेवर विश्वास वाढला पाहिजे म्हणून मी काम केलं आहे, असं सरोदे म्हणाले. राज्यपाल यांना मी फालतू म्हणालो म्हणून मी मिसकंडक्ट केलं असं म्हटलं आहे. जर मी चुकलो असेल तर सामान्य नागरिकांची मी माफी मागेल, असं असीम सरोदे म्हणाले.
आणखी वाचा
			
											
Comments are closed.