सूर्याजी पिसाळसारखा मिंधे 400 वर्ष लक्षात राहिल, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर प्रहार

Uddhav Thackeray on  मराठी : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषत मुंबईत राजकीय नेत्यांच्या ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी आज उमेदवारांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे प्रमख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( मराठी)  यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. जशी लढाई मुघलांबरोबर झाली तशीच लढाई मुंबई महानगरपालिकेची (Mumbai Mahapalika) आहे. सूर्याजी पिसाळ जसा 400 वर्ष लक्षात राहिला तसा मिंधे लक्षात राहील, असा खोचक टोला देखील उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना लगावला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील जोरदार टीका केली.

महानगरपालिकेच्या निवडुकींना सुरुवात झाली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. तर काहीजण अपक्ष निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, काही ठिकाणी भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाचे देखील नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान, सध्या मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण दोन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. तिकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आले आहेत. तर अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवत आहे. दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील हल्लाबोल केला.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

जशी लढाई मुघलांबरोबर झाली तशीच लढाई मुंबई महानगरपालिकेची असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. सूर्याजी पिसाळ सारखा गद्दारीचा टिळा 400 वर्षे झाली तरी मिटला नाही तर या गद्दारांचं काय? असास वाल देखील त्यांनी केला. सूर्याजी पिसाळ जसा 400 वर्ष लक्षात राहिला तसा मिंधे लक्षात राहील, असे म्हणत उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार केला. लढायचं जिंकायचं आणि जल्लोष करायचा असेही ते म्हणाले.

दोन गुजरात्यांच्या हातात आपल्याला मुंबई द्यायची नाही

दोन गुजरात्यांच्या हातात आपल्याला मुंबई द्यायची नाही असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील टीका केली. आपण मनाने काम करा समोरुन धनाचा वर्षाव मोठ्या प्रमाणात होणार आहे. एकही जागा नतद्रष्टांच्या हाती द्यायची नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. जे आता इथे आले आहेत ते सर्व निवडून आले पाहिजेत असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी : घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये, 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ, तरुणांना लाख रु सहाय्यता निधी, ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा

आणखी वाचा

Comments are closed.