मतदान कुणाला जातं हेच कळतं नाही; उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगाला रोखठोक सवाल
उधव ठाकरे महाराष्ट्र निवडणूक आयोग: राज्यात आगामी निवडणुकांचा पार्श्वभूमीवर मतदार यादीतील गोंधळ, निवडणूक आयोगाचा कारभार आणि मतदार नोंदणीप्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी थेट निवडणूक आयोगाच्या दारात धडक दिली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील (शेकाप) यांच्यासह विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. या बैठकीत विविध पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींबाबत थेट सवाल उपस्थित करत निवडणूक आयोगावर रोष व्यक्त केला. तर यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील विविध मुद्दे उपस्थित केले.
ईसीच्या बैठकीत उधव शाकरे: उधव थेहॅक्रेंच रोकथोक प्रश्न
“मतदान कुणाला जातं हेच कळत नाही!” असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी मतदार यादीतील गोंधळावर नाराजी व्यक्त केली. देशात आता कुठेच निवडणुका नाहीत तर VVPat आणा, अशी मागणी देखील त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली.
शिष्टमंडळाच्या निवेदनातील प्रमुख मुद्दे:
– निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल सामान्यांच्या मनात खूपच शंका
– खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे शंका उत्पन्न होत आहे
– लोकसभा,विधानसभेला किती मतदार वगळले त्याचा तपशील का मिळत नाही?
– एखाद्या व्यक्तीचं नाव का काढलं गेलं ते त्याला का सांगितले जात नाही?
– निवडणूक आयोगाने नावं,त्याचा पूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करावी
– विधानसभेला वापरलेली ऑक्टो 2024 ते जुलै 2025 दरम्यान नावं वाढवलेली यादी अजूनही का प्रसिद्ध नाही?
– मतदार यादीवर अभ्यास करणे हा प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार आहे
– मतदार यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की, कोणाचा दबाव आहे?
Raj Thackeray In EC Meeting: राज ठाकरे काय म्हणाले?
– निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली?
– जे आज 18 वय पूर्ण करत आहे, त्यांनी मतदान करू नये का?
– दोन-दोन ठिकाणी मतदारांचे नाव.
– मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ.
– वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी.
– निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता?
– 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का?
– व्हिव्हिपॅट मशीन लावा.
https://www.youtube.com/watch?v=2jiszela2s
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.