मुंबईत शेवटच्या दिवशी नेमकं काय घडलं, ठाकरे बंधू-शिंदेंनी शेवटपर्यंत गुप्तता का बाळगली? वाचा
मुंबई : मुंबई आणि ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena UBT) आणि शिंदेंच्या सेनेकडून(मराठी Shivsena) शेवटच्या क्षणापर्यंत अधिकृत उमेदवार यादी जाहीर झाली नसल्याचे चित्र बघायला मिळालंहे. तर काही ठिकाणी ऐनवेळी उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने आणि संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची नाव गुप्त ठेवण्यात आल्याचं बोललं जातंय. फक्त उमेदवारांची यादी अर्ज भरण्याची वेळ झाल्यानंतर सुद्धा जाहीर झाली नसल्याने हा सस्पेन्स अद्याप राखले असून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राखले असल्याचे बघायला मिळालं आहे.(महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक 2026)
महापालिका निवडणुकीमध्ये खरंतर उमेदवारांची यादी जाहीर केली जाते. युती-आघाडीच्या जागावाटप होतं आणि उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर त्यांना एबी फॉर्म देऊन ते अर्ज भरतात. मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये कमालीची गुप्तता उमेदवारांची नावे जाहीर करण्यात पाळली गेलीय. शिवाय ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवारांना सुद्धा संधी दिली जात असल्याचं समोर येतंय. त्यामुळे ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना या दोन्ही पक्षांनी मुंबई आणि ठाण्यामध्ये अधिकृत यादी जाहीर करताना विशिष्ट सावधगिरी बाळगताना दिसून आलेहे.
Maharashtra Mahnagarpalika Election 2026 : नेमकी अधिकृत यादी जाहीर करण्यास उशीर का?
बंडखोरी टाळण्यासाठी ठाकरेंची सेना आणि शिंदेंच्या सेनेने आधीच एबी फॉर्म देण्यापासून ते उमेदवार निश्चिती करण्यापर्यंत गुप्तता पाळली. जेणेकरून पक्षांमध्ये बंडखोरी होऊ नये हे महत्वाचं कारण मानलं जात आहे. तर काही ठिकाणी ठाकरेंची सेना आणि शिंदे यांच्या सेनेने ऐनवेळी उमेदवार बदलल्याची किंवा दुसऱ्या पक्षातील उमेदवार घेतल्याची सुद्धा उदाहरण पाहायला मिळाली आहे.
काही ठिकाणी पक्षात एकाच प्रभागांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक इच्छुक असल्याने उमेदवारी निश्चित करताना नाराजी नाट्य घडणे हे स्वाभाविक होते. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी काही ठिकाणी उमेदवार निश्चिती करण्यात आली. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासापर्यंत उमेदवार निश्चित करण्याचं काम झालंहे. त्यामुळे आपण कोणाकोणाला एबी फॉर्म दिले आणि कोण आपला उमेदवार निश्चित झाला याची यादी करण्यास मोठा विलंब झाल्याचं पाहायला मिळालंहे.
महाराष्ट्राचे राजकारण: ठाकरे बंधू-शिंदेंनी शेवटपर्यंत गुप्तता का बाळगली? वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी
आपण काही ठिकाणी कशाप्रकारे उमेदवार बदलण्यात आले किंवा ऐनवेळी निर्णय घेण्यात आला त्याची काही उदाहरणे पाहूया
– प्रभाग क्रमांक 192 जागा ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मनसेला देण्यात आली. मनसे उमेदवार यशवंत किल्लेदार यांचं नाव जाहीर झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रीती पाटणकर यांनी तातडीने शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि ऐनवेळी शिंदे यांच्या शिवसेनेने आपला आधीचा उमेदवार बदलत प्रीती पाटणकर यांना उमेदवारी दिली.
-प्रभाग क्रमांक 204 मध्ये अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या एक दोन तासांमध्ये माजी आमदार अनिल कोकीळ यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि किरण तावडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज अनिल कोकीळ शिंदे सिनेट प्रवेश केला आणि शिंदे सेनेच्या एबी फॉर्म घेत उमेदवारी अर्ज भरला. पण त्याआधी अरुण दळवी यांनी भाजपमधून शिंदेंच्या सेनेत प्रवेश करून याच प्रभागातून सोमवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे दोन्हीपैकी शिंदे यांच्या सेनेचा अधिकृत उमेदवार निश्चित होणे बाकी आहे.
-अगदी शेवटच्या तासांमध्ये प्रभाग क्रमांक 202 मध्ये श्रद्धा जाधव यांचा मुलगा पवन जाधव आणि त्या ठिकाणचे शाखाप्रमुख विजय इंदुलकर यांचे सुद्धा नाव निश्चित करण्यात वेळ गेला.
– प्रभाग क्रमांक 81 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा अर्ज भरण्यात आला. तर मनसेच्या उमेदवाराकडून सुद्धा अर्ज भरण्यात आला. त्यामुळे उमेदवार निश्चितीसाठी तिथे सुद्धा वेळ लागला
-शिंदेंच्या सेनेमध्ये सोमवारी रात्रीपासून एबी फॉर्म वाटप करायला सुरुवात झाली इच्छुकांची संख्या अधिक असल्याने आणि काही ठिकाणी उमेदवार निश्चित नसल्याने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नाही आणि ऐनवेळी ठाकरेंच्या सेनेतून आलेल्या दोन उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली.
त्यामुळे अशा अनेक प्रभागांमध्ये ही स्थिती पाहायला मिळाली आणि त्यामुळे उमेदवारी दोन्ही पक्षांनी आपले अधिकृत यादी जाहीर न करता एबी फॉर्म वाटप करण्यास प्राधान्य दिले. त्याशिवाय ते वाटप करताना सुद्धा बंडखोरी होऊ नये याची काळजी घेत उमेदवारांची यादी जाहीर करण्यास विलंब केला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.