‘बाळासाहेब होते तेव्हा इंडिया आघाडी नव्हती, त्यामुळे त्यांचं स्मारक…’ ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद “बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे उद्घाटन ज्यावेळी होईल, त्यावेळीच्या सरकारला त्याचं श्रेय जाईल. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार थोडे आहेत ते सगळे येथे घेऊ शकतात. मी असं म्हणाला नाही की आमचं सरकार येईल… श्रेयाची लढाई बाळासाहेबांच्या स्मारकात होऊ नये. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले ते श्रेय करू शकत नाही. बाळासाहेब होते तेव्हा इंडिया आघाडी नव्हती, त्यामुळे त्यांच्या स्मारकाबाबत इंडिया आघाडीचं यामध्ये काही नाही”, असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बाळासाहेब ठाकरे यांच्या महापौर बंगल्यातील स्मारकाबाबत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, गेली काही वर्ष बाळासाहेबांच्या स्मारकाचा काम सुरु होतं आणि चर्चा सुद्धा सुरु होती. सावरकर स्मारक सुद्धा बाजूला आहे. ज्या जागेवर बाळासाहेबांचं स्मारक होतं आहे, त्याच्या बाजूलाच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक आहे. एकतर महापौर बंगला ही वास्तू म्हणून पाहात नाही, आमचं त्याच्याशी भावनिक नातं आहे. शिवसेना प्रमुख आणि युतीच्या अनेक बैठका याठिकाणी झालेल्या आहेत. त्यामुळे या वास्तुचं वैभव जपून तिथे काम करणे अवघड होती. महापौर बंगला एक भावनात्मक बंधन आमच्यासाठी आहे. हेरिटेज वास्तूला हात न लावता काम करणं अवघड होतं. आरिटेक्ट आभा लांबा यांनी काम केलं… त्यांनी सांगितलं भूमिगत दालन आपण करूया. खबरदारी घेणं आणि काम पूर्ण करणे ही जिक्रिचा आणि अवघड होतं. आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट यांचा अभिनंदन धन्यवाद..
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे म्हणायचे मी कपाटातला माणूस नाही मैदानातला माणूस आहे त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा कुठेही आत्मचरित्र नाही. याचा विचार करून हे स्मारक तयार केलं आहे. बाळासाहेबांवर श्रद्धा असणाऱ्यांना आम्ही पुढच्या 23 जानेवारीला 2026 ला अर्पण करणार आहोत.. तुमच्याकडे सुद्धा काही फोटो असतील आठवणी असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवा.
सुभाष देसाई म्हणाले, राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी अनेक जागांची पाहणी केली आणि त्यानंतर महापौर निवासस्थानाची जागा निश्चित केली. CRZ चा एक बंधन, महापौर निवासस्थान हेरिटेज असल्यामुळे त्याचं जतन करायचा होतं. शिवाय, झाडं तोडायची नाही तर त्याचं जतन सुद्धा आम्ही केलय. बाळासाहेब ठाकरे यांची आवडती जागा होती ते अनेकदा येथे येत असतं. अटल बिहारी वाचपेयी पंतप्रधान असताना त्यांची भेट बाळासाहेबांनी येथे घेतली होती. 23 जानेवारी 2027 ला बाळासाहेबांची जन्मशताब्दी आहे. 23 जानेवारी 2026 जन्मशताब्दी वर्ष सुरू होईल आणि त्याच्या सुरुवातीला या स्मारकाचं उद्घाटन करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
अधिक पाहा..
Comments are closed.