‘एक होती माया’ पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी प्रकाशन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अनंत सोनवणे लिखित ‘एक होती माया’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार, 8 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

‘एक होती माया’ या पुस्तकात ताडोबाच्या राणीची नाटय़मय जीवनकहाणी मांडण्यात आली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या सोहळय़ाला लेखक आणि वन्यजीव संशोधक डॉ. कृष्णमेघ कुंटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Comments are closed.