ठाकरेंनी भेट दिली, शिंदेंनी थेट पूरग्रस्त कुटुंबाला मदत पोहोचवली; सरनाईकांनी घर बांधून देण्याचह


धाराशिव: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असताना ईटकुर गावच्या शिरसाट या पूरग्रस्त कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केलं. ठाकरेंनी सांत्वन केलेल्या या कुटुंबाला एकनाथ शिंदे (मराठी Shivsena) शिवसेनेने थेट मदत केली. किराणा, चादर, सतरंजी भांडीकुंडी असं जीवनावश्यक वस्तूचे किट शिरसाट कुटुंबाला भेट दिलं. धाराशिवचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी या कुटुंबांना त्यांना व्हिडीओ कॉल करून मदतीचं आश्नासन देत बाकी माहिती घेतली. यावेळी तुमच्या घरी कोण आलं होतं, त्यांनी तुम्हाला मदत केली का? अशी विचारणा केली. त्यानंतर तुम्हाला लागेल तेवढी मदत करू असा आश्वासन देखील त्यांनी दिलं. पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवर फोटो लावण्यावरून उद्धव ठाकरे सेनेकडून शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली. या परिस्थितीत शिंदेने उद्धव ठाकरे यांनी भेट दिलेल्या कुटुंबांना थेट मदत करून प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

Pratap Sarnaik: एकनाथ शिंदे तुमच्या बरोबर आहेत

धारशिवमधील शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी किराणा, चादर, सतरंजी भांडीकुंडी असं जीवनावश्यक वस्तूचे किट शिरसाट कुटुंबाला नेऊन दिलं, यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्हिडिओ कॉल करून कुटुंबाला धीर दिला. यावेळी त्यांनी प्रश्न विचारला कोण कोण आलं होतं, त्या महिलेने सरनाईकांना उत्तर देताना म्हटलं उद्धव ठाकरे आले होते, खासदार, आमदार, सगळे होते, त्यावर सरनाईकाने म्हटलं त्यांनी किती मदत केली तुम्हाला? महिला म्हणाली काहीच नाही, काही दिलं नाही. फक्त फोटो काढून नेले, माहिती घेतली. त्यावर सरनाईक म्हणाले एकनाथ शिंदे तुमच्या बरोबर आहेत, काही काळजी करू नका. त्यांनी मला आवर्जून तुम्हाला मदत करायला सांगितलं. त्यांनी मला म्हटलं की, तुम्ही पालकमंत्री आहात तिथे आपल्या शिवसैनिकांना पाठवा आणि त्यांना तातडीने मदत करा आणि ती मदत आपण कालपासून चालू केली आहे, असंही सरनाईकांनी म्हटलं आहे.

Pratap Sarnaik: घर बांधणीला मदत लागेल ती सगळी मदत शासनातर्फे…

तर भविष्यात तुमच्या घर बांधणीला वगैरे जी काही मदत लागेल ती सगळी मदत शासनातर्फे केली जाईल आणि वैयक्तिक शिवसेनेकडून देखील केली जाईल, असं आश्वासन सरनाईकांनी त्या पूरग्रस्त भागातील बाधित महिलेला दिले आहेत. त्यानंतर त्या महिलेने सरनाईकांशी बोलताना म्हटलं, मला घर बांधून द्या. बाकी काही नको. आत्ता मंत्री घरी आले त्यामुळे सगळ्यांचं लक्ष माझ्या घराकडे गेलं, त्याआधी माझ्या घराकडे कोणी बघितलं नाही.

uddhav Thackeray visit: उद्धव ठाकरेंनी केली धाराशिवमध्ये पाहणी

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला, त्यांनी दौऱ्यात पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी त्यांना भेटून आपली अवस्था व्यक्त केली असून, सरकारकडून मदतीची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत असताना, सरकारला कठोर शब्दांत इशारे दिले होते.

आणखी वाचा

Comments are closed.