रशियावर सर्वात मोठा हल्ला,मॉस्कोच्या वेशीपर्यंत युक्रेनचे ड्रोन धडकले; 6 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात आज युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. युक्रेनचे हजारो ड्रोन हवाई सुरक्षा भेदून रशियाची राजधानी मॉस्कोच्या वेशीपर्यंत धडकले. या हल्ल्यांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यात मॉस्कोजवळ ई-कॉमर्स कंपनी वाईल्डबेरीजच्या वितरण केंद्राला भीषण आग लागली. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने हल्ल्याबाबत माहिती दिली. त्यानुसार, गेल्या 24 तासांमध्ये युक्रेनने अनेक क्रूझ क्षेपणास्त्रs आणि हजारो ड्रोनने हल्ला केला. रशियाने 9 क्रूझ क्षेपणास्त्र आणि सुमारे 1500 ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. सुमारे 600 ड्रोन मॉस्कोवर डागण्यात आले होते. त्यात वाईल्डबेरिज या कंपनीच्या मोठय़ा वितरण केंद्राला आग लागली. हे गोदाम जवळपास दोन लाख चौरस मीटर परिसरात पसरले आहे. येथील मोठय़ा भागात आग पसरली आहे. युक्रेनकडून गेल्या महिनाभरात या कंपनीला लक्ष्य करण्यात येत असून कंपनीची 20 गोदामे आणि इतर इमारतींवर हल्ले करण्यात आले आहेत.

रशियाकडून नागरी वसाहतींना लक्ष्य केल्याचा झेलेन्स्कींचा आरोप

रशियाकडून नागरी रहिवासी भाग आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केला आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांवर गेल्या आठवडाभरात 1600 पेक्षा जास्त ड्रोन, 1500 पेक्षा जास्त गायडेड बॉम्ब आणि 62 क्षेपणास्त्रs डागली. त्यात मोठय़ा प्रमाणावर बॅलिस्टीक क्षेपणास्त्रs होती. ही क्षेपणास्त्रs रोखणे युक्रेनला अवघड जात आहे. युक्रेनकडे या क्षेपणास्त्रांना रोखणाऱ्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा साठा जवळपास संपत आला आहे. त्यामुळे ही क्षेपणास्त्रs तत्काळ द्यावी, अशी विनंती झेलेन्स्की यांनी अमेरिका व युरोपियन देशांना केली आहे.

Comments are closed.