उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरण! मुंबई हायकोर्टानं आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

उमेश कोल्हे खून प्रकरण उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. उमेश कोल्हे हत्यांकड मधील आरोपीची जमानत याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. उमेश कोल्हे हत्यांकड मध्ये NIA नी 11 जणांना अटक केली होती, त्यात पकडलेल्या पशुवैद्यकीय डॉक्टर युसूफ खाननी दाखल जमानत याचिका दाखल केली होती. यावर आज कोर्टानं निर्णय घेत याचिका फेटाळली आहे.

2022 मध्ये उमेश कोल्हे यांची स्कूटरवरून घरी परतत असताना हत्या करण्यात आली होती

21 जून 2022 रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास उमेश कोल्हे यांची स्कूटरवरून घरी परतत असताना हत्या करण्यात आली होती. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, ही हत्या पूर्वनियोजित होती आणि समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हेतू होता. पीडितेच्या बाजूने न्यायालयाला सांगितले की, ज्या व्हॉट्सअँप ग्रुपमध्ये नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकण्यात आली होती त्यात फार्मासिस्ट आणि वैद्यकीय प्रतिनिधींचा समावेश होता. डॉ. युसुफ खान हे या ग्रुपमधील एकमेव मुस्लिम सदस्य होते. 24 जून 2022 रोजी उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ तिच्या फोटोसह एक संदेश शेअर केला. असा आरोप आहे की डॉ. युसुफ खान यांनी पोस्टचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो दुसऱ्या व्हॉट्सअँप ग्रुपमध्ये शेअर केला, त्यानंतर हत्येचा कट रचण्यात आला.

युसूफ खान नियमितपणे कोल्हेंच्या दुकानातून औषधे खरेदी करत होता

युसूफ खान हा पशुवैद्य आहे आणि तो उमेश कोल्हे यांना पूर्वीपासून ओळखत होता. तो नियमितपणे कोल्हेंच्या दुकानातून औषधे खरेदी करत होता. दोघेही “ब्लॅक फ्रीडम” नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे सदस्य होते, ज्यामध्ये पशुवैद्यकीय केमिस्ट आणि वैद्यकीय प्रतिनिधींचा समावेश होता. युसूफ खान हा या ग्रुपमधील एकमेव मुस्लिम सदस्य होता. न्यायालयाने म्हटले की, कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्टमुळे खान नाराज झाले होते. त्यांनी असा दावा केला की त्यांना फक्त कोल्हे यांच्या व्यवसायावर बहिष्कार टाकायचा होता. मात्र, रेकॉर्डवरील पुराव्यांवरून उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद पटण्यासारखा वाटला नाही.

न्यायालयाने म्हटले की जर हेतू फक्त व्यवसाय थांबवण्याचा असता तर संदेश केवळ ग्राहकांपुरता मर्यादित असता. खानने ही पोस्ट असंख्य व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर आणि कोल्हेशी कोणताही व्यवसायिक संबंध नसलेल्या व्यक्तींना प्रसारित केली. यावरून स्पष्ट होते की त्याचा हेतू आर्थिक दबाव नव्हता तर चिथावणी देणे आणि लक्ष्य करणे हा होता.

आणखी वाचा

Comments are closed.