अर्थमंत्री म्हणाले, 12 लाखांपर्यंत कर माफ; पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारच्या घोषणेची हवाच क
मोदी सरकारचं निवडणुकीतनंतरच अंदाजपत्रक आहे. निवडणुकीनंतर पहिल्या वर्षात काही कटू निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळे आर्थिक सुधारणा करता येतात. असं काहीतरी होईल असं आम्हाला अपेक्षित होतं मात्र तसं झालं नाही. सगळ्यांना टॅक्सबाबत कौतुक आहे. आता 12 लाखपर्यंत टॅक्स नसेल असं म्हणतात. परंतु याचा लाभ घ्यायचा असेल तर आधी जी टॅक्समध्ये सूट मिळायची ती बंद होणार नाही. त्यामुळे खरंच लोकांना फायदा होईल असं वाटत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
…तर शेतकरी आत्महत्या रोखणार कसे?; पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल
देशाचा आर्थिक विकासदर मंदावत आहे. सरकारने देखील ते मान्य केलं आहे. 2047 पर्यंत भारत विकसित होणार हे दिवा स्वप्न दाखवत आहात का?, ते याची नेमकी व्याख्या सांगत नाही. देश गरीब आहे परंतु लोकं गरीब आहेत अशी सध्या परिस्थितीत आहे. दरडोई उत्पन्नात आपण 147 क्रमांकावर आहोत. लोकांचे सरासरी वार्षिक उत्पन्न वाढवण गरजेचे होतं मात्र तसं दिसत नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. शेतकऱ्यांचे अश्रू पुसतील अशी अपेक्षा होती, परंतु असं काहीच केलं नाही. शिक्षण क्षेत्रात देखील काहीच केलं नाही. अर्थमंत्र्यानी कृषी विभागाचं कौतुक केलं. परंतु त्यांची प्रमुख मागणी हमी भाव मिळण्याचा कायदा याबाबत काहीच केलं नाही. आजही राज्यात दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतायत. जर खर्चापेक्षा कमी उत्पन मिळालं तर शेतकरी आत्महत्या रोखणार कसे?, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. 10 लाख कोटी गुंतवणूक होणार अशी घोषणा केली. मात्र ते अस्तित्वात येईल असं वाटत नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
चीनने एआयबाबत अमेरिकेला मागे टाकले, आपण कुठे आहोत?
शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होईल, असं वाटत होतं मात्र तस काहीच होतं नाही. चीनने एआयबाबत अमेरिकेला मागे टाकले आहे. यात आपण कुठे आहोत हा प्रश्न आहे. 23 आयआयटी सुरू करण्यात आलं आहे. परंतु आता तिथल्या दर्जा खालावण्याची परिस्थिती आहे. कारण तिथ शिकवण्यासाठी स्टाफ नाहीय. विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता परदेशी कंपन्या भारतात येतील. परदेशी विमा कंपन्या भारतात येतील. मात्र इथल्या विमा कंपन्यांना भक्कम करण गरजेचे आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Comments are closed.