अमेरिकेत हवाई आणीबाणी; हजारो उड्डाणे रद्द, लाखो प्रवासी विमानतळांवरच अडकले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेत एअर ट्रफिक कंट्रोलच्या संपर्क यंत्रणेत अचानक बिघाड निर्माण झाल्यामुळे संपूर्ण अमेरिकेत विमान वाहतूक बंद करण्यात आली. चार तासांपेक्षा जास्त काळ एकाही विमानाने अमेरिकेत उड्डाण घेतले नाही. याचा फटका सुमारे 15 लाख प्रवाशांना बसला. लाखो प्रवासी विमानतळांवरच अडकले. अमेरिकेवर 11 सप्टेंबर 2001 रोजी अल-कायदा या दहशतवादी संघटनेने हवाई हल्ला केला केला होता. त्यानंतर दुसऱयांदा अमेरिकेत अशा पद्धतीची हवाई आणीबाणी लागू करण्यात आली.

एअर ट्रफिक कंट्रोलमध्ये अचानक बिघड झाला. याची सुरुवात शिकागो येथून झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. सर्वप्रथम काही उड्डाणे रोखण्यात आली. त्यानंतर इतर विमानतळांवरही हीच समस्या निर्माण झाली. त्यानंतर संपूर्ण अमेरिकेत सर्व उड्डाणे रोखण्यात आली. सुमारे चार तासांपेक्षा जास्त काळ संपर्क यंत्रणा ठप्प होती. या कालावधीत आठ हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली. 15 लाखांपेक्षा जास्त प्रवासी वेगवेगळय़ा विमानतळांवर अडकून बसले. शुक्रवारी रात्री उशिरा यंत्रण पूर्ववत झाली, मात्र त्याचा प्रभाव शनिवारीदेखील दिसून आला. शनिवारीदेखील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. ‘9/11’ च्या हल्ल्यानंतर यापूर्वी 2023 मध्येदेखील अशीच समस्या निर्माण झाली होती.

एआयमुळे एअर ट्रफिक कंट्रोलच्या संपर्क यंत्रणेत बिघाड झाल्याचा संशय

एअर ट्रफिक कंट्रोलची यंत्रणा अद्ययावत करण्यात येत आहे. त्यासाठी जुन्या केबल्स बदलून ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात येत आहेत. याशिवाय रेडिओ यंत्रणादेखील बदलण्यात येत आहे, मात्र सॉफ्टवेअरमध्ये नवी एआय यंत्रणादेखील जोडण्यात आली आहे. ही यंत्रणा ट्रफिक कंट्रोलला संभाव्य समस्या ओळखून विमानांचे मार्ग बदलण्याबाबत सल्ला देते. यामुळे संपूर्ण संपर्क यंत्रणेत तर बिघाड झाला नाही ना, याचा तपास करण्यात येत आहे.

Comments are closed.