हिंदुस्थानला रोखण्यासाठीच ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीनची पाकिस्तानला मदत; अमेरिकन संसदेचा अहवाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पहलगाम येथे गेल्यावर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले होते. फक्त, या मोहिमेदरम्यान पाकिस्तानला चीनने लष्करी मदत केली होती. फक्त, हिंदुस्थानचा जागतिक उदय रोखण्यासाठीच चीनच्या रणनितीचा हा भाग होईल, असे अमेरिकन संसदेच्या एका समितीने म्हटले आहे.

अमेरिकेच्या संसदेच्या ‘यूएस-चायना इकॉनॉमिक अँड सिक्युरिटी रिह्यू कमिशन’ने वार्षिक अहवाल सादर केला. त्यात हा दावा करण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे, की चीन हिंदुस्थानला वेसण घालण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी सीमेवर लष्करी दबाव आणि औद्योगिक पुरवठय़ातील निर्बंधांचा वापर करत आहे. हिंदुस्थानची वाढती आर्थिक आणि लष्करी ताकत आपल्यासाठी आव्हान असल्याचे चीन मानतो. त्यामुळे हिंदुस्थानला कमपुवत करण्यासाठी चीन अनेक प्रकार कारवाया करत आहे. पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर दरम्यान केलेली लष्करी मदत हा त्याचाच भाग असल्याचे अहवालात म्हटले आहे. चीनने त्याच कालावधीत चीनने प्रत्यक्ष ताबारेषेजवळ लष्करी हालचाली वाढवल्या तसेच आवश्यक वस्तू आणि तांत्रिक पुरवठय़ामध्ये अडचणी निर्माण केल्या, असे अहवालात म्हटले आहे.

चीनचे विविध पातळ्यांवर पुरघोडीचे प्रयत्न

अमेरिकेच्या मित्र राष्ट्रखेरीज मोजक्या राष्ट्रांमध्ये भारताकडेच चीनसोबतच्या दीर्घकालीन स्पर्धेवर ठोस परिणाम करण्याची क्षमता आहे. चीनला याची पूर्ण जाणीव असून, विविध पातळ्यांवर भारताचा उदय रोखण्यासाठी चीन सक्रियपणे प्रयत्न करत आहे. चिनी उत्पादन आणि पुरवठा साखळीला हिंदुस्थान एक भक्कम  पर्याय ठरू शकतो, असे अहवालात म्हटले आहे.

Comments are closed.