हिंदुस्थानचा दक्षिण कोरियावर रोमहर्षक विजय
अखेरच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानने दक्षिण कोरियावर दमदार विजय साकारला. पहिल्या तिन्ही सत्रांत हिंदुस्थानचा संघ आघाडीवर होता. पण कोरियाने अखेरच्या सत्रात गोल करत पुनरागमन केले. पण हिंदुस्थानने त्यानंतर अखेरच्या मिनिटापर्यंत अभेद्य बचाव करत सामना 2-1 असा जिंकला.
हिंदुस्थानने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. पहिल्या सत्रात हिंदुस्थानला चार पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण त्यांना त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही, पण दुसऱ्या सत्रात मात्र हिंदुस्थानला गोल करण्यात यश मिळाले. मुमताज खानने कोरियाचा बचाव भेदत गोल केला आणि संघाच्या गोलचे खाते उघडले. दोन सत्रांनंतर हिंदुस्थान 1-0 अशी आघाडी घेऊन होता. मध्यंतरानंतर हिंदुस्थानने आक्रमण करत कोरियाच्या गोलपोस्टजवळ जात पेनल्टी मिळवली. या पेनल्टीचा चांगलाच फायदा सुनेलिता टोप्पोने उचलला आणि गोल केला. या गोलसह हिंदुस्थानने 2-0 अशी आघाडी घेतली होती. पण कोरियाने सामन्यात दमदार पुनरागमन केले. सामना संपायला पाच मिनिटे असताना कोरियाच्या होंग यूनग्यूनने गोल केला आणि कमबॅक केले. त्यानंतर कोरिया आक्रमण करत राहिला, पण हिंदुस्थानने अखेरच्या मिनिटापर्यंत त्यांचे आक्रमण थोपावले आणि सामना 2-1 असा जिंकला.
Comments are closed.