Iran US War – इराणचे मालवाहू जहाज अमेरिकेने केलं जप्त, ओमानच्या समुद्रातील कारवाईने आखातात पुन्हा तणाव
पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे होणार्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीत सहभागी होण्यास इराणने नकार दिला आहे. अमेरिकेच्या अवाजवी मागण्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या सातत्याने बदलणाऱ्या भूमिका यामुळे इराणने चर्चेस नकार दिला आहे. अशातच अमेरिकन नौदलाने ओमानच्या समुद्रामध्ये मोठी कारवाई करत इराणचे मालवाहू जहाज जप्त केले आहे. अमेरिकेच्या या कारवाईचा इराणने तीव्र शब्दांमध्ये निषेध केला असून ही समुद्री चाचेगिरी असल्याचे म्हटले. तसेच इराणने अमेरिकन युद्धनौकांवर ड्रोन हल्ले केले. यामुळे आखातामध्ये पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमा होऊ लागले आहेत.
अरबी समुद्रात कार्यरत असलेल्या अमेरिकन सैन्याने 19 एप्रिल रोजी इराणी बंदराच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी-ध्वजाच्या मालवाहू जहाजावर नौदल नाकेबंदीचे उपाय लागू केले.
मार्गदर्शित-क्षेपणास्त्र नाशक USS स्प्रुअन्स (DDG 111) ने M/V Touska ला उत्तर अरबी समुद्रात येताना रोखले… https://t.co/iyzOQd93C3 pic.twitter.com/HwU4XS48Oq
— DOW रॅपिड रिस्पॉन्स (@DOWResponse) 19 एप्रिल 2026
Comments are closed.