इराणवर मोठा हल्ला की ब्यूटीफुल डील? डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प एका बाजूला हल्ल्याबद्दल बोलत आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्यांनी इराणसोबत शांतता कराराची शक्यताही खुली ठेवली आहे. इराणसोबत एक चांगला शांतता करार होऊ शकतो, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. त्यांनी याला एक “ब्यूटीफुल डील” म्हटले आहे.
फ्लोरिडामध्ये मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, हल्ला उद्या होऊ शकतो किंवा एक मोठा करार होऊ शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे, त्याचबरोबर इराणसोबत एका चांगल्या शांतता कराराची शक्यताही खुली ठेवली आहे.
शनिवारी अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये मतदान केल्यानंतर, ट्रम्प यांनी फ्लोरिडामध्ये पत्रकारांशी संवाद साधला आणि इराणविरुद्ध लष्करी कारवाई तसेच कराराच्या शक्यतेवर भाष्य केले. तथापि, त्यांनी अद्याप आपला अंतिम निर्णय स्पष्ट केलेला नाही.
इराणवरील हल्ल्याबाबत ट्रम्प म्हणाले, कदाचित उद्या, मी तसे करण्याची शक्यता आहे. तसेच, एक चांगला, मोठा आणि उत्कृष्ट करार होण्याचीही शक्यता आहे. अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाई सुरू करू शकते. अमेरिका आणि इस्रायल पुन्हा लष्करी कारवाया सुरू करू शकतात, अशा वृत्तांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.