युद्ध महागात पडलं; इराणने अमेरिकेची 81 लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर्स अन् अत्याधुनिक ड्रोन्स पाडले, 3.3 अब्ज डॉलर्सचं नुकसान
इराण आणि अमेरिकेमध्ये गेल्या सात-आठ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात अमेरिकेचे अतोनात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेची जवळपास 81 लढाऊ विमानं, टेहळणी विमानं, हेलिकॉक्टर्स आणि डोन्स नष्ट झाली आहेत किंवा त्यांचे गंभीर नुकसान झाले आहे. यात अमेरिकेचे सुमारे 3.3 अब्ज डॉलर्सचे (27 हजाह कोटी) नुकसान झाले आहे. अमेरिकेच्या ‘काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिस’ या अधिकृत संस्थेच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. ‘इंडिया टुडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
Comments are closed.