Iran US War – इराणकडे जाणारे जहाज अमेरिकन नौदलाने भर समुद्रात रोखले, यूएस सेंट्रल कमांडने दिली माहिती
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे इराण आणि अमेरिकेमध्ये शांतता चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. इराणचे शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल झाले असून पाकिस्तानध्ये मध्यस्थीने अमेरिकेसोबत वाटाघाटीची तयारी सुरू आहे. एकीकडे चर्चेचे दार उघडले जात असताना दुसरीकडे अमेरिकेने इराणवर लष्करी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकन नौदलाने इराणचा ध्वज असलेले एक जहाज इराणच्या बंदराकडे जात असताना अडवले आहे. यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक अद्यापही विस्कळीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मार्गदर्शित-क्षेपणास्त्र नाशक USS राफेल पेराल्टा (DDG 115) 24 एप्रिल रोजी इराणमधील बंदरात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणचा ध्वज असलेल्या जहाजाविरुद्ध इराणच्या बंदरांवर यूएस नाकेबंदी लागू करते. pic.twitter.com/XsGg65nXt2
– यूएस सेंट्रल कमांड (@CENTCOM) 25 एप्रिल 2026
Comments are closed.