IPL 2026 अभिषेकची टोपी विराटच्या डोक्यावर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग धोनी दुखापतीमुळे डगआऊटमध्ये असले तरी विराट कोहली आपल्या बॅटमधून धावांसह अर्धशतकांचाही पाऊस पाडतोय. गुजरातविरुद्धच्या सामन्यात 81 धावांची झंझावाती खेळी करत त्याने अभिषेक शर्माच्या डोक्यावर असलेली ‘ऑरेंज कॅप’ आपल्या डोक्यावर घातली आहे. कोहली आता 328 धावांसह टॉपवर असून अभिषेक शर्मा फक्त 5 धावांनी मागे आहे.

आयपीएल आता मध्यावर आला असल्यामुळे इथे ‘ऑरेंज कॅप’ फार काळ कुणाच्या डोक्यावर फिट बसणार नाही, हे निश्चित आहे. कोहलीने 4 षटकार आणि 8 चौकारांसह तिसरे अर्धशतक झळकावत अनपेक्षितपणे ‘ऑरेंज कॅप’ खेचली. कोहलीने आपल्या 19 वर्षांच्या आयपीएल कारकीर्दीत सलग 17 व्यांदा 300 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. फक्त पहिल्या दोन सत्रात म्हणजे 2007 आणि 2008 साली 165 आणि 246 धावा केल्या होत्या. त्यानंतर विराट कोहलीने आपल्या फलंदाजीतील सातत्य कायम राखत गेल्या 17 वर्षांत सात वेळा पाचशेपेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. आतापर्यंत त्याने 274 सामन्यांत 8989 धावा केल्या असून त्यात 8 शतके आणि 66 अर्धशतकांचा समावेश आहे. विराटने 2016 च्या आयपीएलमध्ये 4 शतके आणि 7 अर्धशतके झळकावत 81 धावांच्या सरासरीने आणि 150 धावांच्या स्ट्राईक रेटने 973 धावा केल्या होत्या. तो सर्वाधिक धावांचा अजूनही त्याच्याच नावावर कायम आहे.

सॅमसन आला रे…

‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत सॅमसननेही जोरदार एण्ट्री घेत थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. सध्या त्याचा फॉर्म भन्नाट असला तरी त्यात एक वेगळाच ‘रोलरकोस्टर’ पाहायला मिळतोय. या हंगामातील सहा शतकांपैकी तब्बल दोन शतके त्याच्याच नावावर आहेत आणि त्याने 293 धावांचा टप्पा गाठत थेट टॉप-5 मध्ये घुसखोरी केलाय. मात्र दोन शतके आणि मध्ये एक 48 धावांची खेळी सोडली तर इतर डावांमध्ये एकेरी धावसंख्या हेच वास्तव त्याच्या वाटय़ाला आलेय.

Comments are closed.