कानाखाली मारली आणि कोट्यवधी कमावले! श्रीसंतचा खळबळजनक दावा, हरभजनविरुद्ध सर्व संबंध तोडले
टीम इंडियाचा माजी खेळाडू एस. श्रीसंत आणि हरभजन सिंग यांच्यातील जुना कानाखाली मारल्याचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला असून, यामुळे त्यांच्यातील मैत्री आता पूर्णपणे संपली आहे. 2008 मधील आयपीएलच्या प्रसिद्ध ‘स्लॅपगेट’ प्रकरणानंतर दोघांनीही पडद्यामागे एकत्र येत वाद मिटवला होता. मात्र, अलीकडेच एका जाहिरातीमुळे श्रीसंत पुन्हा दुखावला गेला असून त्याने हरभजनला सोशल मीडियावर ब्लॉक केले आहे. “आता आमचे कोणतेही नाते राहिलेले नाही,” अशा स्पष्ट शब्दांत श्रीसंतने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
श्रीसंतच्या म्हणण्यानुसार, हरभजनने जुन्या ‘थप्पड’ प्रकरणावर आधारित एक जाहिरात केली, ज्यातून त्याने सुमारे 80 लाख ते 1 कोटी रुपये कमावले. धक्कादायक म्हणजे, हरभजनने श्रीसंतला फोन करून या जाहिरातीबद्दल सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करण्याची विनंती केली होती. या गोष्टीचा श्रीसंतला खूप मनस्ताप झाला. “मी त्याला माफ केले असले तरी तो प्रसंग कधीच विसरणार नाही. जर तुम्ही एखादी गोष्ट विसरलात, तर समोरची व्यक्ती पुन्हा तशीच चूक करते आणि हरभजन त्याचे जिवंत उदाहरण आहे,” असे श्रीसंतने ‘मातृभूमी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
गद्दार..! हरभजन सिंग आणि अशोक मित्तल यांच्या घराबाहेर ‘आप’च्या कार्यकर्त्यांची निदर्शने
आपल्या भावना व्यक्त करताना श्रीसंत पुढे म्हणाला की, तो आता हरभजनला आपला भाऊ मानत नाही. त्याने हरभजनच्या सार्वजनिक प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, “तो एक महान व्यक्ती असू शकतो, पण माझ्यासाठी तो केवळ एक अभिनय करत आहे आणि श्रीसंतला असा अभिनय मान्य नाही,” असे तो म्हणाला. आपल्या पालकांनी आपल्याला माफ करायला शिकवले आहे, पण विसरायला नाही, असे सांगत श्रीसंतने या वादावर आता पडदा टाकण्याचे संकेत दिले असले तरी त्यांच्यातील मैत्रीत मोठी दरी निर्माण झाली आहे.
कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी खेळपट्ट्यांमध्ये सुधारणा करा; हरभजन सिंगची BCCI आणि ICC कडे मागणी
Comments are closed.