US Open मध्ये सत्तापालट! रायबाकिनाचा सबालेंकावर ऐतिहासिक विजय, पराभवानंतर बेलारूसी खेळाडूने रागाच्या भरात….

यूएस ओपन २०२६ महिला एकेरीचे विजेतेपद कझाकस्तानच्या एलेना रायबाकिनाने जिंकले. शनिवारी (१२ सप्टेंबर) आर्थर ऍश स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात रायबाकिनाने अरिना सबालेंकाला ६-४, ५-७, ६-२ असे पराभूत केले. हे रायबाकिनाचे पहिलेच यूएस ओपन ग्रॅंड स्लॅम ठरले आहे.
दोन तास २१ मिनिटे रंगलेल्या या सामन्याचा शेवट उत्कृष्ठ ‘एस’ने झाला. रायबाकिनाने चॅम्पियनशीपच्या पॉईंटवर एक शक्तिशाली शॉट खेळत कारकिर्दीतील महत्त्वाचा विजय मिळवला. हे तिचे एकूण तिसरे ग्रॅंड स्लॅम ठरले आहे.
रायबाकिनाच्या विजयामुळे सबालेंकाचे ऐतिहासिक हॅट्ट्रीकचे स्वप्न भंगले आहे. ओपन इरामध्ये सलग तीन यूएस ओपन जिंकणारी केवळ तिसरी महिला होण्यापासून सबालेंका केवळ एक पाऊल दूर होती, मात्र त्यामध्ये रायबाकिनाने अडसर आणला.
मागील काही स्पर्धांपासून रायबाकिनाने सबालेंकाला चांगलेच आव्हान दिले आहे. तिने यावर्षीच्या डब्लूटीए फायनल्स आणि ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सबालेंकाला पराभूत केले होते. तिच्या या धमाकेदार कामगिरीमुळे तिने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही गाठले आणि आता यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा बेलारूसच्या खेळाडूला पराभूत केले.
पहिला सेट रायबाकिनाने जिंकला, मात्र दुसऱ्या सेटमध्ये सबालेंकाचे वर्चस्व दिसले. सेट ४-५ असता रायबाकिनाने दोन ब्रेक पॉइंट्स वाचवून सेट बरोबरीत आणला. त्यानंतर सबालेंकाचे सर्व्हिस कायम राखत ६-५ अशी आघाडी घेतली. या सेटमध्ये नंतर रायबाकिनाने काही चुका केल्या आणि सबालेंकाने हा सेट ७-५ असा जिंकला.
तिसऱ्या सेटमध्ये रायबाकिनाने आक्रमक खेळ केला. तिने ४-२ अशी आघाडी घेत सामन्यावर नियंत्रण मिळवले. ५-२ असा सेट असताना रायबाकिना विजेतेपदासाठी सर्व्ह करण्यास आली. तिने संयम राखला आणि सामना जिंकला.
पराभवामुळे सबालेंकाने रागाच्या भरात आपली रॅकेटही तोडली आणि पंचांना शिवीगाळही केली. तिच्या या कृतीचे फोटोही व्हायरल झाले. (US Open 2026 Women’s Singles Elena Rybakina beats Aryna Sabalenka then Sabalenka destroys her racquet)
Comments are closed.