Bengal Student Union Controversy वापरलेले कंडोम, दारुच्या बाटल्या अन् बरंच काही, कॉलेजमध्ये सापडलेल्या वस्तूनंतर तृणमूल काँग्रेस संशयाच्या भोवऱ्यात

कोलकाताजवळील न्यू बॅरकपूर येथील एपीसी कॉलेजच्या युनियन रूमचे कुलूप उघडल्यानंतर तेथे आक्षेपार्ह वस्तू आढळल्याने गोंधळ उडाला. वापरलेली कंडोमची पाकिटे, दारू आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्या, काठ्या आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. या घटनेनंतर कॉलेज कॅम्पसमधील युनियन रूमच्या गैरवापराबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

वास्तविक पाहता, विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका नसल्यामुळे, २०२५ मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थी संघटना कक्ष सील करण्यात आले होते. अलीकडेच, उच्च शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थी संघटना कक्ष पुन्हा उघडण्याचे निर्देश दिले आहेत.

यानुसार, प्राचार्य किंवा प्रभारी शिक्षक यांच्यासह पाच सदस्यीय पथकाची उपस्थिती, संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करणे आणि सात दिवसांच्या आत विकास भवनला अहवाल सादर करणे अनिवार्य आहे. तसेच, कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळल्यास त्याची माहिती तात्काळ नियामक मंडळ आणि डीपीआय यांना देण्याच्या सूचनाही आहेत.

या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, शुक्रवारी एपीसी कॉलेजमधील युनियन रूम उघडण्यात आली. या रुममध्ये मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह साहित्य सापडले. यानंतर विद्यार्थ्यांनी असा आरोप केला आहे की, टीएमसीच्या राजवटीत टीएमसीपीच्या कार्यकर्त्यांनी युनियन रूमवर ताबा मिळवला होता आणि इतर विद्यार्थ्यांना आत प्रवेश दिला जात नव्हता.

विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, आता समोर आलेल्या सामग्रीची जबाबदारी टीएमसीपीने घेतली पाहिजे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थीही या घटनेमुळे संतप्त झाले आहेत. त्यांनी दोषींना ओळखण्याची आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Comments are closed.