मी ठीक आहे, ‘KBC 18’ मध्ये पुनरागमन करताच अमिताभ बच्चन याचे स्पर्धकाला मजेशीर उत्तर – Tezzbuzz

बाॅलिवुड सुपरस्टार अमिताभ बच्चन हे लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती 18’ च्या सेटवर आहेत. काही काळ ते या शो पासुन दुर होते, मात्र ते आता पुन्हा एकदा हा शो चालवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या पुनरागमानाची पहिली झलक शोच्या नवीन प्रोमोमध्ये पाहयला मिळत आहे. यामध्ये बिग बी त्यांच्या जुन्या स्टाईलमध्ये सेटवर प्रवेश करताना आणि स्पर्धकांसोबत विनोद करताना दिसत आहेत. त्यांच्या आगमनाची ही बातमी त्यांच्या चाहत्यांसाठी एक आंनदाची बातमी ठरणार आहे.

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन लोकप्रिय टीव्ही क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती 18’ मध्ये लवकरच दिसणार असुन आता प्रेक्षकांना नवीन भागांसाठी जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. हा शो 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसारित होईल.

‘कौन बनेगा करोडपती 18’ च्या नवीन प्रोमोमध्ये अमिताभ (amitaab)बच्चन यांचा तोच उत्साह पुन्हा दिसत आहे. आणि यात जेव्हा एक स्पर्धक त्यांच्या तब्येतीबाबत विचारतो तेव्हा ते उत्तर देतात, तुमची तब्येत बरी नव्हती. तुम्ही कसे आहात सर…, तेव्हा अमिताभ बच्चन हे त्याच्या उत्तम शैलीत उत्तर देतात, तुम्ही कसे आहात.. तेव्हा स्पर्धक म्हणतो मी ठीक आहे. तेव्हा बीग बी म्हणतात, तुम्ही ठीक आहात, मी पण ठीक आहे. हे ऐकुण उपस्थिक असलेले सर्वजण खळखळुन हसु लागले, त्यांच्या ही शैली प्रेक्षकांना पुन्हा एकदा जुन्या केबीसीची आठवण करुण देईल.

‘कौन बनेगा करोडपती या शोचे अमिताभ बच्चन हे महत्वाचे भाग राहीले आहेत, काही दिवसांपुर्वी त्यांची तब्बेत ठीक नसल्यामुळे त्यांनी ब्रेक घेतला होता. तर आता सोनी लिव्हने अधिकृतपणे जाहीर केले आहे की ‘कौन बनेगा करोडपती 18’ चा नवीन भाग सोमवार, 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसारित होईल.

हेही वाचा

मकरंद देशपांडे, समीर धर्माधिकारी एकत्र झळकणार, नव्या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

Comments are closed.