ठाण्यात चार महिन्यांच्या चिमुकलीला पळवले, पोलिसांनी दहा तासांत शोधून काढले
आई वडिलांच्या कुशीत झोपलेल्या एका चार महिन्यांच्या चिमुकलीला एका भंगार विक्रेत्या महिलेने पहाटे पळवून नेल्याची घटना माजिवडा ब्रीजखाली घडली. आई-वडिलांनी तक्रार दाखल करताच तपासाची चक्रे फिरवत चितळसर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या दहा तासांत त्या चिमुकलीला शोधून काढत आई-वडिलांच्या ताब्यात दिले. मूल चोरी करणाऱ्या एका ५२ वर्षीय भंगार विक्रेत्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
छोगालाल मंगीलाल वाणिया (२७) हे त्यांच्या कुटुंबासह माजिवडा ब्रीजखाल मुक्काम करतात. ते रात्री या ब्रीजखाल झोपले असताना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांना जाग आली तेव्हा त्यांच्या शेजार झोपलेली चार महिन्यांची चिमुकली गायब असल्याच कळताच त्यांच्य हातापायातील त्राणच गेले त्यांनी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वरखेडे यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या सुचनेनुसार परिमंडळ पाचमधील पोलिसांची पाच पथके तपासासाठी रवाना करण्यात आली
आई-वडिलांच्या आनंदाश्रूचा बांध फुटला
पोलिसांच्या या पथकाने घटनास्थळाच्या परिसरासह कापूरबावडी, ठाणे रेल्वे स्थानक आणि कळवा परिसरात शोधमोहीम राबवली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस कळवा येथील सायबा नगरातील सार्वजनिक शौचालयाजवळ पोहोचले, तेव्हा तेथे त्यांना ही पळवून नेलेली चिमुकली आढळली. तिला पळवून नेणाऱ्या कमल मोरे (५२) या भंगार विक्रेत्या महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. अवघ्या दहा तासांत पोलिसांनी आपली चिमुकली शोधून आणून दिल्यानंतर तिला कुशीत घेताना आई-वडिलांच्या आनंदाश्रूचा बांध फुटला होता.
Comments are closed.