भिवंडीच्या तलावात दोन मुले बुडाली, एकाचा मृत्यू, एकाला वाचवले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तलावात पोहण्यासाठी गेलेली दोन अल्पवयीन मुले बुडाल्याची घटना भादवड येथे घडली. त्यातील आयुष मौर्य (१२) याचा बुडून मृत्यू झाला असून त्याचा मित्र अनिकेत याला वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे मौर्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

भिवंडीतील भादवड परिसरातील योगीधाम सोसायटीत आयुष मौर्य आणि त्याचा मित्र अनिकेत हे राहतात. हे दोघेही त्यांच्या अन्य एका मित्रासोबत भादवड तलावात पोहण्यासाठी गेले. यावेळी आयुष आणि अनिकेत हे तलावात उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. हा प्रकार पाहून काठावर बसलेल्या तिसऱ्या मित्राने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यावेळी एका नागरिकाने प्रसंगावधान राखत अनिकेतला पाण्याबाहेर काढले. मात्र आयुष मौर्यचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.

Comments are closed.