‘भूत बंगला’ बॉक्स ऑफिस अंदाज; ‘भूल भुलैया’ची जादू पुन्हा घडणार का? पहिल्याच दिवशी दिसतीय उत्तम कमाई – Tezzbuzz
अक्षय कुमार हा एक बॉलीवूड लोकप्रिय अभिनेता आहे. जो सध्या त्याच्या उत्तम चित्रपटामुळे चर्चेत असतो. तर त्याचा आगामी चित्रपट म्हणजे भूत बंगला. आणि आता चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. अक्षय कुमारने आतापर्यंत आणि उत्तम चित्रपट केले आहे. तसेच भूत बंगला चे दिग्दर्शक प्रियदर्शन आहेत. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन या जोडीने या आधीही उत्तम चित्रकार दिले आहेत. तर बऱ्याच वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकत्र येऊन काम केली आहे. आडवांस बुकिंग 2 दिवसापुर्वी सुरू झाले असून हा चित्रपट 17 एप्रिल 2026 पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. मात्र 16 एप्रिल 2026 पासून प्रेव्हीव चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. तर आता पासुनच चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल बाजारात सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.
प्रियदर्शन आणि अक्षय कुमार (kumar)हे दोघेजण काही काळानंतर एकत्र काम करत आहे. आणि त्यानी आता पर्यत उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यामुळे ‘हेरा फरी’ आणि ‘भूल भुलैया’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेली तीच जादू आणि हास्यकल्लोळ प्रेक्षक पुन्हा एकदा अनुभवण्याची अपेक्षा करत आहेत. तळागाळातील लोकांमध्ये चित्रपटाबद्दल असलेली जागरूकता आणि चर्चा प्रभावी आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर, अनेकजण त्याची तुलना ‘भूल भुलैया’ फ्रँचायझीशी करत आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. मात्र, चित्रपटासमोर एक छोटे आव्हान आहे. ‘धुरंधर 2’ च्या अलीकडील ऐतिहासिक यशामुळे ‘भूत बंगला’ बद्दलची चर्चा काही प्रमाणात कमी आहे.
भूत बंगला या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग ताज्या वृत्तांनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी रात्री 8 वाजेपर्यंत प्री-सेल्समधून अंदाजे 60 लाख रुपयांचा निव्वळ आकडा पार केला आहे. ‘पेड प्रिव्ह्यू’ला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसादही समाधानकारक ते खूप चांगला असल्याचे वृत्त आहे. आणि यात ॲडव्हान्स बुकिंगच्या कमाईत अजुन वाढ होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांची जादू चालली, ‘भूत बंगला’चा पहिला रिव्ह्यू आला समोर
Comments are closed.