खरा बॉक्स ऑफिसचा बाजीगर कोण? ह्या अभिनेत्याने 100 कोटी कमाई करणाऱ्या 20 चित्रपटांचा केला विक्रम – Tezzbuzz
भारतीय चित्रपटसृष्टी मध्ये आणि आणि चित्रपट गाजतात आणि बॉक्स ऑफिस रेकॉर्ड पण तोडतात. तर आतापर्यंत काही विशेष चित्रपटांनी हे रेकॉर्ड तयार केले आहेत. चित्रपटसृष्टीच्या बॉक्स ऑफिस इतिहासात १०० कोटींचा क्लब एक महत्त्वाचा टप्पा बनला आहे. तर या रेकॉर्डची सुरुवात आमिर खानच्या ‘गजनी’ या चित्रपटाने केली देशांतर्गत बाजारपेठेत 100 कोटी रुपयांचा निव्वळ महसूल ओलांडणारा पहिला भारतीय चित्रपट रेकॉर्ड तयार केला. या यादीत रजनीकांत, विजय आणि कमल हासन यांसारख्या खान त्रिकुटासारख्या दिग्गज कलाकारांचे वर्चस्व केले. तर नुकतच आता एका स्टारने या सर्वांना मागे टाकले आहे. हा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार आहे.
अक्षय कुमार (kumar)याचा नुकताच एक चित्रपट रीलीज झाला आहे. हा चित्रपट म्हणजे प्रियदर्शन दिग्दर्शित भूत बंगला आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. तर अक्षय कुमारचे आता भारतीय बॉक्स ऑफिसवर 20 चित्रपट आहेत ज्यांनी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त निव्वळ महसूल मिळवला आहे. हा पराक्रम करुन अक्षय सलमान खानही मागे टाकले आहे. अक्षयच्या 20 चित्रपटापैकी सहा चित्रपट कोविड-19 नंतरच्या काळात प्रदर्शित झाले आहेत. तर आता ह्या नुकताच रीलीज झालेला भूत बंगला या चित्रपटाची आता सर्वत्र जादु दिसत आहे.
अक्षय कुमारच्या प्रचंड यशामागे त्याची चित्रपटांची अचूक निवड आणि कामाची वेगवान गती आहे. 2007 ते 2019 या काळात त्याने एक ‘सुवर्णकाळ’ अनुभवला. कारण त्या काळात त्याच्याकडे सर्वात जास्त काम आणि उत्तम चित्रपट मिळाले होते. अक्षयने केवळ आपल्या चित्रपटांची संख्याच वाढवली नाही, तर त्यांचे बजेट नियंत्रित करून त्यांच्या यशाची शक्यताही वाढवली. याच कार्यक्षमतेमुळे तो 20 चित्रपटांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे.
‘व्हील ऑफ फॉर्च्यून इंडिया’च्या अंतिम सोहळ्यादरम्यान अक्षय कुमारला अश्रू अनावर
Comments are closed.