बॉक्स ऑफिसवर रिलीजपूर्वीच ‘कॉकटेल 2’चा धुमाकुळ, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून कोटींची कमाई – Tezzbuzz

कॉकटेल बॉलीवूड मधील लोकप्रिय चित्रपट आहे. या चित्रपटाचे चाहते आणि काही लोकप्रियता आजही तितकेच आहे. या चित्रपटाचा सिक्वेल सुद्धा काही आता रिलीज होत आहे. आणि कॉकटेल 2 चित्रपटात शाहिद कपूर, कृती सेनन आणि रश्मिका मंदाना हे मुख्य भुमिकेत आहेत. हा चित्रपट रीलीज पुर्वीच खुप चर्चेत आहे. प्रेक्षकांनी यातील गाण्याना उत्तम प्रतिसाद दिला आहे, आणि निर्मात्यांनी नुकतेच ‘कॉकटेल 2’ चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू केले, सुरुवातीला प्रतिसाद संथ असला तरी, प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना बुकिंगच्या आकड्यांमध्ये सुधारणा होत आहे.

‘कॉकटेल 2′ या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंग 14 जून सुरुवात झाली आहे. तर याने आतपर्यत 57000 तिकिटांची विक्रि केली आहे. आणि कमाई 1.97 कोटी रुपयांची आतापर्यत झाली आहे. आणि काही जागा राखीव केल्या होत्या त्याची तर ब्लॉक केलेल्या जागांसह ही कमाई 3.67 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर आता रिलीज झाल्यानंतर कमाई कीती होइल हा चित्रपट थिएटर मध्ये किती दिवस टिकतो हे पाहण्यासारखे आहे.

”कॉकटेल २’  हा चित्रपट उद्या 19 जुन 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदाजानिया यांनी केले आहे. हा चित्रपट 2012 मधील ‘कॉकटेल’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे, ज्यामध्ये सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटी मुख्य भूमिकेत होते. त्यावेळेस हा चित्रपट चांगलाच गाजला होता. आता
”कॉकटेल 2′ हा प्रेक्षकांच्या पंसतीस उतरतो का हे पाहण्यासारखे आहे.

हेही वाचा

जुळ्या बाळांच्या आगमनानंतर दिव्यांका त्रिपाठीचा खास फोटोशूट चर्चेत

Comments are closed.