कान्स मध्ये ऐश्वर्या राय पेक्षा मुलगी आराध्यानेच वेधलं लक्ष; तिचा कॉन्फिडन्स पाहून चाहते म्हणाले- हीच पुढची स्टार – Tezzbuzz

ऐश्वर्या राय हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तीने आता पर्यत अनेक चित्रपट करुन प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. तर आता सध्या कान्स फेस्टिवल सुरू आहे आणि अनेक कलाकार तिथे जाऊन येत आहेत मात्र अनेक जणांना ऐश्वर्या राय तिथे जाण्याची आणि तिथे तिला पाहण्याची वाट पाहत होते तर  आता तो क्षण आला आहे. ऐश्वर्या राय आता या फेस्टीवल ला पोहचली आहे. आणि तेथील तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. ऐश्वर्याने तिच्या रेड कार्पेट लूकने सर्वांना थक्क केले. ही अभिनेत्री एका आकर्षक निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती आणि तिने रेड कार्पेटवर आपली चमक दाखवली. ज्या क्षणी तिने रेड कार्पेटवर पाऊल ठेवले, त्या क्षणी सर्वांची नजर तिच्यावर खिळली.

ऐश्वर्या (aishwarya)राय बच्चन कान्स चित्रपट महोत्सव 2026 मध्ये शुक्रवार, 22 मे 2026 रोजी तिची एक झलक पाहायला मिळाली. तसेच ऐश्वर्यासोबत तिची मुलगी, आराध्या बच्चन होती आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. या माय लेकीच्या लुकने चाहते खुप आंनदीत झाले आणि त्या दोघी ही खुप सुंदर दिसत होत्या. तर या महोत्सव दरम्यानचा या दोघाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तसेच चाहत्याने ही आराध्याचे कौतुक करत म्हणले की, हीच पुढची स्टार

यापूर्वी, ऐश्वर्याने या कार्यक्रमासाठी अमित अग्रवालने डिझाइन केलेला एक खास रॉयल ब्लू गाऊन निवडला होता. ऐश्वर्या रायच्या कान्स आउटफिटमध्ये अमित अग्रवाल यांच्या सिग्नेचर क्रिस्टल व्हेन एम्ब्रॉयडरी तंत्राचा वापर करण्यात आला आहे, परंतु ऐश्वर्या राय बच्चनचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत आणि चाहते अभिनेत्रीच्या लूकचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. तर कामाबाबत पाहिले तर ऐश्वर्याने 2023 मध्ये एका चित्रपटात लास्टचे काम केले होते.

‘मा बहन’ ट्रेलर आउट: कॉमेडी आणि सस्पेन्सचा जबरदस्त तडका, माधुरी दीक्षितने पुन्हा जिंकली प्रेक्षकांची मनं

Comments are closed.