पेट्रोल-डिझेलची भाववाढ, शेतकऱ्यांना डिझेल मिळेना, फडणवीसांनी ती गोष्ट हेरली, म्हणाले, काहीतरी ग
पेट्रोल डिझेलवर देवेंद्र फडणवीस देशभरात गेल्या आठ दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर राज्यातील परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. इंधनाचे दर वाढत असल्याने महाराष्ट्रात विशेषत: ग्रामीण भागात अनेकांनी कॅन आणि बाटल्यांमध्ये पेट्रोल-डिझेल घरी न्यायला सुरुवात केली आहे. परिणामी पेट्रोल, डिझेलचा (Diesel Price) खप अचानक वाढून वाशिम, हिंगोली, परभणी आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. रात्रभर रांगा लावूनही लोकांना पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेल मिळताना दिसत नाही. यावरुन हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. या सगळ्यात शेतीची पेरणी व अन्य कामांसाठी डिझेलची गरज असणाऱ्या शेतकऱ्यांची (Farmers) प्रचंड कोंडी झाली आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आणि शेतीच्या कामांसाठी डिझेल मिळत नसल्याने बळीराजा प्रचंड हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना वेळेत डिझेल उपलब्ध करुन द्या आण त्यांना कोणताही त्रास होणार नाही, अशा उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. (Fuel shortage in Maharashtra)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, शेतकऱ्यांने जे काही डिझेल लागेल, ते उपलब्ध करुन द्या, असे आदेश जिल्हा प्रशासनाल दिले आहेत. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी साठेबाजी करत असेल त्यांच्यावर लक्ष ठेवा. कारण काही भागात डिझेलची मागणी 20 टक्के 30 टक्के वाढली आहे. अशाप्रकारे डिझेलची मागणी अचानक वाढत असेल तर काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे. मी शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, अशादृष्टीने उपाययोजन करण्यास सांगितले आहे. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बूक बघून त्यांना डिझेल देणे सुरु केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Parbhani Diesel News: परभणीत डिझेलची मागणी दीडपटीने वाढली
परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर डिझेल टंचाई निर्माण झाली आहे नागरिक वाहने,कॅन घेवून रांगा लावत आहेत परभणीत दिड पटीने इंधनाची मागणी वाढल्याने ही गर्दी होत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले असून जिल्ह्यात पुरेसा साठा आहे कुणीही साठेबाजी करून नये साठे बाजांवर कारवाई करण्याचे आदेश ही जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी काढले आहेत.
“इंधन बंद होणार का?”, “दर वाढणार का?” अशा चर्चांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,त्यामुळेच पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहेदरम्यान, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शासकीय यंत्रणांना इंधनाचा तुटवडा भासू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी एकूण उपलब्ध साठ्यातून 10 टक्के इंधन आपत्कालीन यंत्रणा शासकीय कार्यालये, रुग्णवाहिका, पोलीस,अग्निशमन दल तसेच इतर अत्यावश्यक सेवांसाठी राखीव ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
Dhule Petrol Diesel: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतूक व्यवसायावर परिणाम
संपूर्ण राज्यात आणि देशभरात इंधनाचा मोठा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत असून याचा परिणाम विविध विभागांवर होत आहे डिझेलचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने याचा परिणाम ट्रान्सपोर्ट व्यवसायावर झाला असून डिझेल वेळेवर मिळत नसून ज्या ठिकाणी डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी अत्यंत कमी डिझेल उपलब्ध होत असल्याने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय चालवायचा तरी कसा असा प्रश्न ट्रान्सपोर्ट संघटनेने उपस्थित केला आहे. परराज्य जात असताना त्या ठिकाणी डिझेलचा पुरवठा होत नसल्याने वाहने अडकून पडत असल्याची प्रतिक्रिया ट्रान्सपोर्ट संघटनेने व्यक्त केली आहे, वाहने अनेक दिवस एकाच जागी थांबून राहत असल्याने यामुळे आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणावर होत असून वाहनांचे कर्ज घेण्याची तरी कसे असा देखील प्रश्न ट्रान्सपोर्ट संघटनेने उपस्थित केला आहे. शासनाने इंधनाच्या पुरवठ्याबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा संपावर जाण्याचा इशारा धुळ्यातील ट्रान्सपोर्ट संघटनेने दिला आहे.
आणखी वाचा
Petrol Diesel Price Hike: महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, आता किती दर वाढले?
आणखी वाचा
Comments are closed.