नसीरुद्दीन शाह जंतर-मंतरवर पोहोचले होते का? व्हायरल व्हिडिओमागचं खरं कारण घ्या जाणुन – Tezzbuzz
सध्या दिल्लीच्या जंतर मंतर येथे विद्यार्थी त्याच्या हक्कासाठी आणि नीटचे पेपर फुटल्याने आंदोलन करत आहेत. तर या आंदोलनाला अनेक दिग्गज कलाकार, व्यक्ती, त्यांना पाठीबां देत आहेत. आणि आता ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर पोहोचले आहेत असा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र जेव्हा हे खरं आहे का तपासुन पाहिले तेव्हा हि गोष्टी निघाली आहे. तर खरे तर नसीरुद्दीन शाह तिथे पोहचलेच नाहीत.
ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह दिल्लीत आलेच नव्हते, त्यामुळे सीजेपीच्या आंदोलनातील त्यांचा सहभाग आणि जंतर मंतरला दिलेली त्यांची भेट ही एक उघड खोटी गोष्ट आहे. तर या व्हायरल व्हीडीओ मध्ये लोक ये-जा करत असताना नसीरुद्दीन शाह आपल्या मुलासोबत उभे असलेले दिसत आहेत. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अशी अफवा पसरवण्यास सुरुवात केली आहे. खरे तर मूळ फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते की नसीरुद्दीन शाह जंतर मंतरवर नसून एका नाट्य कार्यक्रमात होते. ते आंदोलनात सहभागी झाले होते असा लोकांचा गैरसमज व्हावा यासाठी, कार्यक्रमाचे खरे ठिकाण उघड करणारा व्हिडिओचा भाग एडिट करुन काढुन टाकण्यात आला आहे.
नसीरुद्दीन शहा (shah)हे जरी त्या आंदोलन स्थळी आले नसले तरी यांनी सोशल मीडियावर सीजेपीच्या आंदोलनांना पाठिंबा व्यक्त केला होता आणि त्यांच्या पोस्टनेही व्यापक लक्ष वेधून घेतले होते.
दुसरीकडे, पाहिले तर सोमवारी दिल्लीच्या जंतर मंतरवर हाजारो लोक आंदोलनात सहभागी झाले होते. आणि त्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलनस्थळाकडे जाणारे रस्ते बंद केल्यानंतर, त्यामुळे लोकांना छोट्या गल्याचा वापर करुन जाण्याचा प्रयत्न केला मात्र परीस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलीसांनी लाठीचार करायाला सुरुवात केली होती.
‘जना नायकन’मधील विजयचा धडाकेबाज लूक व्हायरल, या तारखेला चित्रपट होणार प्रदर्शित
Comments are closed.