दिल्लीतील आंदोलन फेसलेस म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना अमित ठाकरेंनी सुनावलं, ‘तुम्ही याच लोकां

अमित ठाकरे दिल्ली लाठीचार्ज. दिल्लीत जंतर-मंतर (Jantar Mantar) परिसरात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जनंतर (Lathicharge) देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “पोलिसांनी काठीत खिळे घुसवून विद्यार्थ्यांना मारले, मुलींवर लाठ्या चालवल्या, आता सरकारची लाडकी बहीण कुठे गेली?” असा घणाघाती सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहण्याचे आश्वासनही अमित ठाकरे यांनी दिले आहे. तर, दिल्लीतील आंदोलन फेसलेस म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील अमित ठाकरे यांनी सुनावले.

Amit Thackeray on Delhi LathiCharge: या लोकांना सत्तेचा माज डोक्यात गेलाय

अमित ठाकरे म्हणाले की, “एफआयआर दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत आम्ही, चिंता करू नका. परवा मी दिल्लीला पोहोचलो तेव्हा म्हणाले समजले की, पाच-सहा लोक सिव्हिल ड्रेसमध्ये आले, त्यांनी सांगितलं डॉक्टर्स आहोत. पांढरा कपडा घेऊन आले आणि त्यामध्ये सोनम वांगचूक यांना गुंडाळून घेऊन गेले. तेव्हा मला वांगचूक नाही तर लोकशाही दिसली. 20 दिवस उपोषण करणाऱ्याशी तुम्ही चर्चा करत नाही, त्याला असं उचलतायत. चर्चा केली असती तर तो विषय तेव्हाच संपला असता. त्यानंतर मी अभिजीत दिपकेला भेटलो. त्याच्याकडून माहिती घेतली. काल देशाच्या राजकारणातील सगळ्यात काळा दिवस होता. डार्केस्ट डे होता. या लोकांना सत्तेचा माज डोक्यात गेलाय. ज्या लोकांनी तुम्हाला तिथे बसवलंय त्यांचीच ही परिस्थिती केलीय,” असा हल्लाबोल त्यांनी केला.

Amit Thackeray on Delhi LathiCharge: आता सरकारची लाडकी बहीण कुठे गेली?

अमित ठाकरे पुढे म्हणाले की, “लोकांवर टिअर गॅस फेकताय, लोकांवर लाठीमार करताय. मी एक व्हिडीओ बघितला, एका पोलिसाने काठीत खिळे घुसवले होते, त्याने लोकांना मारत होते, ते दहशतवादी आहेत का? नीटच्या (NEET) पेपरफुटीमुळे 20 मुलामुलींनी आत्महत्या केलीय, त्यासाठी हे सर्व सुरु आहे अन् तुम्ही खिळे घुसवून लोकांना मारताय, ही कुठची परिस्थिती आणून ठेवलीय तुम्ही? मुलींवर पोलीस लाठ्या चालवत आहेत. तुम्ही भाजपचे पोलीस आहात की राज्याचे पोलीस आहात? निवडणुकीला तुम्हाला लाडकी बहीण सुचते, ती आता प्रश्न विचारला म्हणून गेली, ही भयावह परिस्थिती आहे,” असे त्यांनी म्हटले.

Amit Thackeray on Delhi LathiCharge: अमित ठाकरेंनी फडणवीसांना सुनावले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाला फेसलेस म्हटले. याबाबत विचारले असता अमित ठाकरे म्हणाले की, या फेसलेस लोकांमुळे तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसलात हे तुम्ही विसरू नका. तुम्हाला ते बसवू शकतात तर ते उचलू पण शकतात. सकाळी बोलणारे भाजपचे प्रवक्ते कुठे गेले? त्यांना या विषयावर बोलावसं वाटत नाही का? नीच, राक्षसी प्रकारचे हे राजकारण सुरू आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

Amit Thackeray on Delhi LathiCharge: लोकं शांत बसणार नाहीत

अमित ठाकरे पुढे म्हणाले की, पोलिसांनी पार्लमेंटच्या बाहेर मुलींचे कपडे फाडले आणि तिकडे पंतप्रधान आत होते. पोलिसांवर दबाव आहे. पण आंदोलकांबाबत सहानुभूती दाखवावी. तो आतंकवादी नाही, हा एका विषयासाठी भांडतोय. त्याच्याशी कसं वागलं पाहिजे हे तुम्हाला कळालं पाहिजे. ज्या सरकारला लोकांनी एवढं प्रेमाने सत्तेत बसवलं, बहुमत दिलं ते सरकार आता लोकांशी असं वागतंय? हे अख्खा देशभरात पेटणार आहे. लोकं शांत बसणार नाहीत, असे देखील त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

Sadabhau Khot on CJP Protest: जंतरमंतरवरील विद्यार्थी आतंकवादी, केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊच नये; सदाभाऊ खोतांची टिप्पणी

Comments are closed.