दीपिकाच्या मॅटरनिटी फोटोशुटमध्ये लेक दुआने वेधले लक्ष, चाहते म्हणाले – ही तर रणवीरची छोटीशी प्रतिकृती – Tezzbuzz

चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आहे. आणि त्यांनी नुकतंच त्यांच्या आयुष्यातील खास क्षणांचा अनुभव घेतला आहे. दीपिका पदुकोण हि लवकरच आई होणार आहे, आणि तिने गरोदर असल्याची घोषणा केल्यापासून तिचे चाहते या स्टार जोडप्यांच्या आयुष्यातील प्रत्येक झलकची आतुरतेने वाट पाहत असतात. तर नुकतेच या जोडप्यानी काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. दिपिकाचे मॅटर्निटी फोटोशूट केले असुन त्यात त्यांची पहिली मुलगी दुआ, आणि रणवीर सिंग देखील दिसत आहे.

अभिनेत्री दिपिकाने मुलीच्या दुसऱ्या वाढदिवशी त्यांचे तिघांचे फोटो शेअर केले आहेत. आणि त्याच्या या पोस्टने साऱ्याचे लक्ष वेधुन घेतले आहे. या फोटोतुन असे दिसुन येत आहे की, त्याच्या बाळाबाबत ते खुप उत्सुक आहेत. तसेच त्यांच्या या कुटुंबाची एक गोड झलक फोटोतुन दिसुन येत असुन दुआने त्याच्या नुरागस आणि गोंडस रुपाने अनेक चाहत्यांची मने जिंकुन घेतली आहेत. त्यांच्या या पोस्टला अनेक चाहत्यानी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आणि खुप जणांनी लाईक केलेलं दिसुन येत आहे.

दरम्यान रणवीर(ranveer) सिंग देखील त्याच्या आगामी प्रकल्पामध्ये व्यस्त आहे. अभिनेता सध्या प्रलय या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. आणि काही वृतानुसार गेल्या महिन्यात मुंबईत या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. तर त्याचे काम लवकर पुर्ण करुन तो त्याच्या कुंटुबासाठी वेळ देतो. आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी पितृत्व रजा घेऊ शकतो.

हेही वाचा

‘मिर्झापूर द मुव्ही’चा बाॅक्स ऑफिसवर धुमाकुळ, पाचव्या दिवशी केली इतकी कमाई

Comments are closed.