टीम इंडियाच्या जर्सीचा रंग पुन्हा बदलला, आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी मोठा निर्णय

हॉकी इंडियाने भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा रंग केशरी केला असता, खूप मोठा वाद निर्माण झाला होता. आता हा वादग्रस्त निर्णय मागे घेतल्याचे दिसते, कारण पुन्हा एकदा पुरुष आणि महिला दोन्ही संघ आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पारंपरिक निळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहेत.
हॉकी विश्वचषक 2026 नेदरलॅंड्स आणि बेल्जियम येथे खेळला गेला. त्यामध्ये भारताच्या दोन्ही संघांनी केशरी रंगाची जर्सी घातली होती. यावरून विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. तेव्हा हॉकी इंडियाने निळ्या खेळपट्टीमुळे दिसण्यास ह्या तांत्रिक अडचणींचे कारण दिले होते.
राष्ट्रीय संघांच्या जर्सीचा रंग बदलल्यामुळे अनेक आजी-माजी खेळाडूंनी टीकाही केली होती. तसेच महासंघामध्ये अंतर्गत वादही निर्माण झाला.
आता, संघ आशियाई खेळांची तयारी करत असून पहिली पसंती निळ्या रंगाच्या जर्सीला देण्यात आली आहे. तसेच केशरी रंगही पर्याय म्हणून ठेवला आहे.
“भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) आम्हाला आमच्या पसंतीच्या किटची निवड विचारली होती आणि हॉकी इंडियाने निळ्या रंगाला पहिली पंसती दिली आहे. तसेच केशरी रंगाला दु्य्यम पसंती दिली आहे,” असे हॉकी इंडियाचे खजिनदार शेखर मनोहरन यांनी मंगळवारी (8 ऑगस्ट) सांगितले.
विश्वचषकावेळी निळ्या टर्फवर निळ्या रंगाच्या जर्सीमुळे परिणाम होऊ शकतो, तर पिवळे आणि केशरी रंग हे पर्याय म्हणून समोर आले होते. तेव्हा भारताने राष्ट्रध्वजात केशरी रंग असल्याने जर्सीच्या रंगासाठी केशरी पर्याय निवडला होता. त्यानंतर माजी कर्णधार परगत सिंग, धनराज पिल्ले, अजित पाल सिंग आणि विरेन रास्किन्हा यांच्यासह अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
“हा बदल आम्हाला विचारून केला गेला नाही,” असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी दावा केला होता. त्यानंतर वातावरण अधिकच तापले होते.
भारताच्या विश्वचषकातील मोहिमेमुळे जर्सीच्या रंगाचा वाद काही काळ शमला. या स्पर्धेत पुरुष संघाने सहापैकी दोन सामने जिंकत स्पर्धेशेवटी आठवे स्थान, तर महिला संघाने त्यांच्या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम असे पाचवे स्थान काबीज केले होते. (Hockey Team India’s jersey color changes again; major decision for the Asian Games 2026.)
Comments are closed.