प्रभासचा खतरनाक अंदाज, ‘फौजी’च्या दमदार पोस्टरसह रिलीज डेट जाहीर – Tezzbuzz
‘फौजी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये सुपरस्टार प्रभास असणार आहे. तर नुकतच सोशल मीडियावर एका प्रभावी नवीन पोस्टरद्वारे अभिनेत्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे जाहीर केली. हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर हा ‘पिरियड ॲक्शन ड्रामा’ 3 डिसेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आणि प्रेक्षाकांना तारीख समजताच हे आजुन उत्सुक झाले आहेत.
तेजने (prabhas)या रिलीज केलेल्या पोस्ट मध्ये प्रभासचा एक अत्यंत आक्रमक आणि दमदार लुक पाहायला मिळत आहे. आणि पावसात भिजलेला आणि रक्ताने माखलेला प्रभास, हातात बंदूक घेऊन मृतदेहांच्या ढिगाऱ्यामध्ये उभा असल्याचे यात दिसते. यात एक रागीट युध्द्याची झलक पाहायला मिळत आहे.
‘फौजी’ हा एक ‘पिरियड ॲक्शन चित्रपट आहे. तर याचे दिग्दर्शक हनू राघवपुडी हे करत आहेत. ते एक उत्तम दिग्दर्शक म्हणुन ओळखले जातात. प्रभास आणि या दिग्दर्शकाचा हा पहिलाच संयुक्त प्रकल्प असल्याने, हा चित्रपट या वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
या चित्रपटाची घोषणा होताच या चित्रपटाची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट्ला लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे. #FaujiNation हा हॅशटॅग वेगाने ट्रेंड होऊ लागला आहे. प्रभासच्या या रांगड्या लूकचे सर्वत्र कौतुक होत आहे. आणि हि पोस्ट शेअर करुन निर्मात्यांनी चाहत्याची उत्सुकता आजुन वाढवली आहे.
या चित्रपटात प्रभाससोबत इमानवी, मिथुन चक्रवर्ती, जया प्रदा आणि अनुपम खेर यांसारख्या दिग्गज कलाकार असणार आहेत.
समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक प्रवास..; ‘समर्थ’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित
Comments are closed.