मोठी बातमी! ICC ची भारतीय वेगवान गोलंदाजावर कारवाई, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यादरम्यान घडली घटना
सध्या भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर असून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने विजय मिळवला. त्यामुळे भारताने वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज (16 जुलै) मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला काही तासांचा कालावधी शिल्लक असताना आयसीसीने भारतीय वेगवान गोलंदाजावर कारवाई केली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात आयसीसीच्या आचारसंहिता ‘लेव्हल 1’ चे उल्लंघन केल्याप्रकरणी भारताचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारला दोषी ठरवण्यात आले आहे. त्याला ताकीद देण्यात आली आणि त्याचबरोबर त्याला एक डिमेरीट पॉइंटही मिळाला आहे. त्याचा 24 महिन्यांमधील पहिलाच गुन्हा असल्याने हा पॉइंट देण्यात आला.
ब्रारने खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या आचारसंहितेच्या कलम 2.9 चे उल्लंघन केल्याचे आढळले. हे कलम आंतरराष्ट्रीय सामान्यावेळी अयोग्य आणि धोकादायक पद्धतीने खेळाडूवर किंवा खेळाडूच्या जवळ चेंडू फेकण्याशी संबंधित आहे.
ही घटना इंग्लंडच्या डावातील आठव्या षटकात घेतली. त्यावेळी ब्रारने क्षेत्ररक्षण करताना चेंडू उचलून फलंदाजाच्या दिशेने अयोग्य आणि धोकादायक पद्धतीने फेकला.
ब्रारने आपला गुन्हा कबूल केला असून त्याला अमिरात आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरीचे रिची रिचर्डसन यांनी शिक्षा सुनावली. तसेच हे आरोप त्या सामन्यातील मैदानातील पंच कुमार धर्मसेना आणि माईक बर्न्स, तिसरे पंच सॅम नोगज्स्की आणि चौथे अधिकारी रसेल वॉरेन यांनीही केले होते.
Comments are closed.