एका सामन्यात 3 शतकं, 267 धावांचा पाठलाग; टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलं असं!

अमेरिकेत आयोजित Major League Cricket मेजर लीग क्रिकेट MLC स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यादरम्यान टी20 क्रिकेटच्या इतिहासात अनेक विक्रम प्रस्थापित झाले. एमआय न्यूयॉर्क MI New York आणि वॉशिंग्टन फ्रीडम Washington Freedom यांच्यातील या सामन्यात, वॉशिंग्टन फ्रीडमने 267 धावांचे लक्ष्य अवघ्या 18.4 षटकांत पूर्ण केले. यासह, टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या यशस्वी रन चेसचा नवा जागतिक विक्रम त्यांनी नोंदवला.

याव्यतिरिक्त, या सामन्यात तीन फलंदाजांनी शतके झळकावली. टी20 क्रिकेटच्या इतिहासात एकाच सामन्यात तीन शतके लागण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, एमआय न्यूयॉर्कने 20 षटकांत 266 धावांचा प्रचंड डोंगर उभारला. कर्णधार निकोलस पूरनने 106 धावांची शानदार खेळी केली. त्याला कायरन पोलार्ड (64) आणि क्विंटन डी कॉक (51) यांची उत्तम साथ लाभली.

267 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वॉशिंग्टन फ्रीडमची सुरुवात खराब झाली. अवघ्या 10 धावांत दोन बळी गमावल्यानंतर, कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि अँड्रिज गॉस यांनी तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या 89 चेंडूंमध्ये 241 धावांची विक्रमी भागीदारी रचत सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले.

स्टीव्ह स्मिथ Steve Smith 110 धावांवर नाबाद राहिला, तर अँड्रिज गॉसने Andries Gous 51 चेंडूंमध्ये 132 धावांची धडाकेबाज खेळी केली. या विजयासह, वॉशिंग्टन फ्रीडमने टी20 क्रिकेटमधील T20 Run Chase सर्वात मोठ्या यशस्वी रन चेसचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम PBKS पंजाब किंग्सच्या नावावर होता. त्यांनी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अनुक्रमे 262 आणि 265 धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले होते.

टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठे यशस्वी रन चेस T20 World Record Highest

वॉशिंग्टन फ्रीडम – 267 धावा (विरुद्ध एमआय न्यूयॉर्क)
पंजाब किंग्स – 265 धावा (विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स)
पंजाब किंग्स – 262 धावा (विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स)
दक्षिण आफ्रिका – 259 धावा (विरुद्ध वेस्ट इंडिज)

आतापर्यंत मेजर लीग क्रिकेटवर परदेशी खेळाडूंचे वर्चस्व राहिले होते. मात्र, आता अमेरिकेच्या अँड्रिज गॉसने इतिहास रचला आहे. MLC स्पर्धेत शतक झळकावणारा तो पहिला अमेरिकन फलंदाज ठरला आहे. गॉसने 51 चेंडूंत 132 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने 10 चौकार आणि 12 षटकार मारले. त्याच्या आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यातील दमदार भागीदारीमुळे वॉशिंग्टन फ्रीडमने अविश्वसनीय विजय मिळवला. परिणामी, टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास घडवला.

Comments are closed.