TVFची गाजलेली वेब सिरीज, 4 सीझननी जिंकली प्रेक्षकांची मनं, प्रत्येक एपिसोड आहे कॉमेडी-ड्रामाने भरलेला – Tezzbuzz
आज-काल ओटीटी वर मालिका चित्रपट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. आणि त्यामध्ये ही आणि कॅटेगरी आता उपलब्ध आहे जसे की हॉरर, फॅमिली टाईप, मनोरंजक, सस्पेन्स थ्रिलर असे प्रकार आता उपलब्ध आहेत. त्यातला त्यात हॉरर चित्रपटांचा क्रेझ आजकाल जास्त दिसून येतो. प्रेक्षक घर बसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून नवनवीन चित्रपट मालिका पाहू शकतात. आणि अशीच एक वेब सीरिजबद्दल बोलणार आहोत, जी प्रेक्षकांना खूप आवडली आहे, आणि आता तिच्या नवीन सीझनची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. हलकी कॉमेडी आणि कौटुंबिक नाट्य असलेल्या जर तुम्हाला आवडत असतील तर ही सीरिज तुम्हाला नक्की आवडेल.
तर या सीरीजचे नाव ‘गुल्लक’ आहे. या सीरीजमध्ये वैभव राज गुप्ता, जमील खान, गीतांजली कुलकर्णी, हर्ष मायर आणि सुनीता राजवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर या सीरिजने ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकुळ घातला आहे. आणि तिचे चारही सीझन वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केले आहेत. ‘गुल्लक’चा पहिला सीझन अमृत राज गुप्ता यांनी, दुसरा 2019 आणि तिसरा सीझन पलाश वासवानी यांनी, तर चौथा सीझन श्रेयांश पांडे यांनी दिग्दर्शित केला होता. पहिला सीझन मध्ये, दुसरा 2021 मध्ये, तिसरा 2022 मध्ये आणि ‘गुल्लक 4’ जून 2024 मध्ये प्रदर्शित झाला, आणि हे सर्व सीझन यशस्वी ठरले.
'पिगी बँक‘ (gullak)हि सीरीज सोनीलिव्हवर तुम्हाला पाहता येइल. आणि या मालीकेला आयएमडीबीवर या मालिकेला 9.1 रेटिंग आहे. तसेच हि मालीका टीव्हीएफ निर्मित आहे. प्रेक्षकांना हि मालिका आवडली असुन ते नवीन सीझनची मागणी करत आहेत. मात्र, निर्मात्यांनी अद्याप ‘गुल्लक’च्या पाचव्या सीझनबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
निधनानंतर हरियाणवी अभिनेत्री दिव्यांका हिची शेवटची पोस्ट व्हायरल
Comments are closed.