रिलीज आधीच ‘जन नायकन’ची ॲडव्हान्स बुकिंग मधून झाली इतक्या कोटींची कमाई – Tezzbuzz
थलपथी विजय यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘जना नायकन’ लवकरच चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. सेन्सॉर बोर्डाने जवळपास सात महिन्यांनी मंजुरी दिल्यानंतर अखेर हा चित्रपट 23 जुलै 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज आहे . या चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंगला रविवारपासून सुरुवात झाली आहे. आणि या चित्रपटाच्या कमाईने चांगलाच आता वेग पकडला आहे.
‘जना नायकन’ या चित्रपटाने रिलीज पुर्वीच धुमाकुळ घालायला सुरुवात केली आहे. आतापर्यत या चित्रपटाची 6 लाखांहून अधिक तिकिटे अवघ्या काही दिवसांत विकली गेली आहेत. हा चित्रपट भारतात सुमारे 8000 शोजसह मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होत आहे. आणि त्यापैकी 3500 हून अधिक शोज एकट्या तामिळनाडूमध्ये होणार आहेत. तर अंदाजे या चित्रपटाने आतापर्यत ऍडव्हान्स बुकिंग भारतात 15 कोटी रुपये आणि जगभरात 27 कोटी केली आहे. तर आता हा चित्रपट रीलीज नंतर कीती कमाई करतो हे पाहण्यासारखे राहील.
तामिळनाडू चित्रपटगृह मालक संघटनेच्या मते, तिकीटांची प्रंचड मागणि होत आहे. चेन्नईच्या प्रसिद्ध कमला सिनेमाची 10000 हून अधिक तिकिटे बुकिंग सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच विकली गेली, तर मायाजाळ मल्टिप्लेक्समधील 48 शो एका तासापेक्षा कमी वेळातच हाऊसफुल्ल झाले. राज्य सरकारने चेन्नईमध्ये तिकिटांचे दर 190 पर्यंत मर्यादित ठेवले आहेत.
या चित्रपटात विजय सोबत गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज, प्रार्थना (pooja)हेगडे, बॉबी देओल, ममिता बैजू, नरेन हे कलाकार प्रमुख भुमिकेत आहेत.
या चित्रपटात विजयसोबत पूजा हेगडे, बॉबी देओल, ममिता बैजू, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज आणि नरेन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध रविचंद्रन यांनी दिले असून, छायांकन सत्यन सूर्यन यांचे आणि संपादन प्रदीप ई. राघव यांचे आहे. या आठवड्यात प्रेक्षक थलपथी विजयला शेवटच्या वेळी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सज्ज झाले आहेत.
हेही वाचा
‘जना नायकन’मधील विजयचा धडाकेबाज लूक व्हायरल, या तारखेला चित्रपट होणार प्रदर्शित
Comments are closed.